Fact : बाबा रामदेव यांच्यासोबत असलेली ही महिला पतंजलीशी संबधित

False राजकीय सामाजिक

आतुन किर्तन वरुन तमाशा असतो, अशी माहिती देत आपाराव कांबळे यांनी एक छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. या छायाचित्रावर म्हटले आहे की, लगता है इसका भी टाईम नजदीक है या छायाचित्रात असणारी महिला नेमकी कोण आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. या महिलेचे छायाचित्रात दिसणारे बाबा रामदेव यांच्यासोबत काय नाते आहे? असे प्रश्न या पोस्टमुळे उपस्थित होतात. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी  

बाबा रामदेव यांच्या या छायाचित्राचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स सर्च केले. त्यावेळी आम्हाला याबाबतचा जो परिणाम मिळाला. त्यात बाबा रामदेव यांच्याबाबतच्या वेगवेगळ्या वृत्तांचा समावेश होता. यातील आय चौक इन या हिंदी संकेतस्थळाने 27 ऑगस्ट 2017 रोजी दिलेला एक लेख दिसून आला. या लेखात ही महिला कर्करोगाने ग्रस्त असल्याचे म्हटले आहे. भारत खबर डॉट कॉमनेही ही महिला कर्करोग ग्रस्त असल्याचे म्हटले आहे. एका ब्लॉगवरही 27 नोव्हेंबर 2014 मध्ये दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे नाव प्रिती असून त्या पतंजली योगपीठाच्या संस्थापक सदस्य आहेत. त्यांना कर्करोग झाला आहे. बाबा रामदेव यांनी त्यांची वेदांता हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. त्यांना प्राणायाम शिकवला आणि काही औषधे भेट दिली. ही सर्व सत्य कशावरुन असा प्रश्न मात्र कायम असल्याने आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. या परिणामात आम्हाला बाबा रामदेव यांचे काही व्हिडिओसुध्दा दिसून आले. यात द लंलनटॉपचा एक व्हिडिओ आम्हाला दिसून आला. या व्हिडिओत बाबा रामदेव यांनी याबाबत स्वत: खुलासा केला असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.

त्यानंतर आम्हाला बाबा रामदेव यांच्या व्हेरिफाईड फेसबुक खात्यावर 26 नोव्हेंबर 2014 रोजीची एक पोस्ट दिसून आली. या पोस्टनमध्ये त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. 

Archive 

निष्कर्ष

बाबा रामदेव यांनी एका कर्करोगग्रस्त महिलेची 2014 मध्ये भेट घेतली होती. या भेटीची छायाचित्रे वेगवेगळ्या खोट्या दाव्यांसह पसरविण्यात येत असल्याने स्वत: रामदेव यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact : बाबा रामदेव यांच्यासोबत असलेली ही महिला पतंजलीशी संबधित

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False