‘हमारा काम गाय बचाना है, लड़की नहीं’ असे योगी आदित्यानाथ म्हणाले नव्हते; ती केवळ फेक न्यूज

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

हाथरस प्रकरणानंतर महिला सुरक्षेच्या मुद्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बरीच टीक होत आहे. त्यातच आता दावा केला जात आहे की, ‘हमारा काम गाय बचाना है, लड़की नहीं,’ असे योगी आदित्यनाथ म्हणाले. पुरावा म्हणून सोबत एका वृत्तपत्राच्या बातमीचे कात्रण फिरत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हा दावा असत्य आढळला. एका व्यंगात्मक वेबसाईटवरील विनोदी लेखाला खरे समजल्यामुळे हा सर्व अपप्रचार होत आहे.

काय आहे दावा?

“योगी आदित्यनाथ का फिर गैर जिम्मेदाराना बयान कहा हमारा काम गाय बचाना है, लड़की नहीं। अशा मथळ्याच्या बातमीचे कात्रण सोशल मीडियावर फिरत आहे. 

योगी आदित्यनाथ यांनी खरंच असे विधान केले असेल का?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम इंटरनेवटर शोध घेतला असता अशी एकही बातमी आढळली नाही ज्यामध्ये म्हटले की, योगी आदित्य नाथ यांनी असे वादग्रस्त विधान केले. एका राज्याचे मुख्यमंत्री आणि नेहमी चर्चेत राहणाऱ्या योगींना जर असे विधान केले असते तर नक्कीच त्याची मोठी बातमी झाली असती. परंतु, तसे काही दिसत नाही.

बातमीच्या विधानातील की-वर्ड्सद्वारे सर्च केले असते कळाले की, योगी आदित्यनाथांच्या नावे 2018 पासून हे विधान फिरत आहे. फेसबुकवर सर्वप्रथम 10 एप्रिल 2018 रोजी अशा आशयाची पोस्ट शेयर करण्यात आली होती. 

या पोस्टमध्ये आर-ह्युमर टाईम्स नावाच्या एका वेबसाईटची लिंक दिलेली आहे. योगी आदित्यनाथ की सफाई. कहा- हमारा काम गाय बचाना है, लड़की नहीं।  असे या लिंक मधील लिंकचे शीर्षक आहे. परंतु, ही लिंक आणि वेबसाईट दोन्ही डिलीट झालेल्या आहेत.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

वेबॅक मशीन नावाची एक अर्काइव्ह वेबसाईट आहे. तेथे इंटरनेटवरील जवळपास सर्वच वेबसाईटच्या डेटाचा बॅपअप उपलब्ध असतो. म्हणून आर-ह्युमर टाईम्सच्या या लेखाची लिंक वेबॅक मशीनमध्ये शोधली. विशेष म्हणजे, ती अर्काइव्ह स्वरूपात मिळालीसुद्धा!

आर-ह्युमर टाईम्सच्या वेबसाईटवर 10 एप्रिल 2018 रोजी हा लेख प्रकाशित झाला होता. उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर योगींनी असे वादग्रस्त विधान केल्याचे यामध्ये म्हटले होते. परंतु, सदरील लेखाचे काळजीपूर्वक वाचन केल्यावर कळते की, ही पत्रकारितेची शैली नाही. योगी यांनी कधी, कुठे, कोणाशी बोलतना हे विधान केले याची माहिती नाही. तसेच स्पेलिंगमध्ये चुका, मुख्यमंत्र्याविषयी विनोदात्मक टिप्पणी यामध्ये केलेली आहे.

मूळ पेज येथे पाहा – Rhumor Times (Archive)

सदरील वेबसाईटच्या ‘अबाउट अस’ सेक्शनला भेट दिल्यावर स्पष्ट झाले की, ही खरी बातमी नाही. कारण आर-ह्युमर टाईम्स ही एक व्यंगात्मक वेबसाईट आहे. कंपनीने स्पष्ट म्हटले आहे की, आर-ह्युमर टाईम्सतर्फे व्यंग आणि उपरोधिक लेख प्रकाशित केले जातात. वेबसाईटवरील लेखांमध्ये कोणतेही तथ्य नसते. केवळ मनोरंजनाच्या हेतून उपहास केला जातो. म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्या विधानाची ती बातमी खरी नसून, केवळ एक विनोद आहे. त्यांनी तसे म्हटले नव्हते.

मूळ पेज येथे पाहा – Rhumor Times (Archive)

वृत्तपत्राने ही बातमी का छापली?

आता हा प्रश्न पडतो की, व्हायरल होत असलेले बातमीचे कात्रण कसे आले? 

सध्या व्हायरल होत असलेल्या बातमीच्या कात्रणाचा थोडा अधिक स्पष्ट असणारा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर उपलब्ध आहे. त्याचे निरीक्षण केल्यावर दोन गोष्टी कळतात. एक म्हणजे बातमीची डेटलाईन ‘लखनऊ/दै.मू. ब्युरो’ अशी आहे. यावरून कळते हे ‘दैनिक मूनिवासी नायक’ नावाचे वर्तमानपत्र आहे.

बातमीच्या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये लिहिले आहे की, दैनिक मूलनिवासी नायक नामक अखबार के संवाददाता ने यूट्यूब पर वायरल एक वीडियो और सोशल मीडिया पर आयी एक खबर का हवाला देते हुए बताया की, देश के फायर ब्रॉण्ड गौ-प्रेमी और शौकिया तौर पर यूपी के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने उन्नाव गैंग रेप पर स्पष्ट करते हुए कहा है कि सरकार में आने से पहले हमने उत्तर प्रदेश की जनता से गाय की रक्षा करने का संकल्प किया था, हम आज भी उसपे कायम हैं, कोई नजर उठा के किसी गाय की तरफ देख ले, आँखे निकाल लेंगे, लेकिन हमने लड़की रक्षा का कोई संकल्प नहीं लिया था, अब जो संकल्प हमने लिया ही नही था उसपे हमसे सवाल क्यों पूछ रहे हो सब लोग?”

वरील मजकूर तर जशास तसा आर-ह्युमर टाईम्स वेबसाईटवरील आहे. म्हणजे ही बातमीसुद्धा त्याच व्यंगात्मक बातमीवरून घेण्यात आली आहे. 

दैनिक मूलनिवासी नायक वृत्तपत्राच्या बातमीचे कात्रण

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, योगी आदित्यनाथ यांनी ‘हमारा काम गाय बचाना है, लड़की नहीं’ असे विधान केलेले नाही. आर-ह्युमर टाईम्स नावाच्या एका व्यंगात्मक वेबसाईटच्या उपरोधक लेखामध्ये तसे सर्वप्रथम प्रकाशित करण्यात आले होते. तो लेख केवळ एक विनोद होता. त्यावर विश्वास ठेवू नये.

(तुमच्याकडील शंकास्पद मेसेज/फोटो/व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी 9049053770 या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर पाठवा आणि मिळवा सत्य माहिती 24 तासांच्या आत!)

Avatar

Title:‘हमारा काम गाय बचाना है, लड़की नहीं’ असे योगी आदित्यानाथ म्हणाले नव्हते; ती केवळ फेक न्यूज

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply