अबूधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार का? : सत्य पडताळणी

False आंतरराष्ट्रीय

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तारीख लक्षात ठेवा 20 एप्रिल 2019 ! अबूधाबी मधील हे पहिले भव्य हिंदू मंदिर. या मंदिराचे उदघाटन आपले #प्रिय पंतप्रधान- नरेंद्र मोदी करणार आहेत. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर पालघर रिफॉर्मर या ग्रुपवर विपुल मेहता यांच्या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायलर होणारी ही पोस्ट फेसबुकवर इतरही अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टविषयी सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने पोस्टमध्ये दाखवण्यात आलेला आबुधाबी मंदिराचा फोटोला गुगलवर रिव्हर्स ईमेज केले. त्यानंतर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये दाखवण्यात आलेला फोटो हा अबूधाबीमधील हिंदू मंदिराचा नसून, दिल्ली स्थित अक्षरधाम मंदिराचा (अक्षरधाम मंदिर, दिल्ली) हा फोटो आहे.

फेसबुकवर आर्किटेक्चर अँड डिझाईन या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर अक्षरधाम मंदिर, दिल्ली मंदिराचे फोटो 27 जानेवारी 2019 रोजी अपलोड करण्यात आलेले आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह  

व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये दाखवण्यात आलेले अबूधाबीमधील हिंदू मंदिर आणि मुळ मंदिर आपण येथे बघू शकता.

गुगल मॅपवर आपण या मंदिराचे संपुर्ण स्पष्ट छायाचित्र बघू शकता.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये तारीख लक्षात ठेवा 20 एप्रिल 2019! अबूधाबी मधील भव्य मंदिर या मंदिराचे उद्घाटन #प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत, असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रिसेंडो टीमने गुगलवर आबुधाबीमधील पहिले हिंदू मंदिर असे सर्च केले. याविषयावर विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर बातम्या वाचू शकता.

जनसत्ताअर्काईव्ह  (10 फेब्रुवारी 2018)

20 एप्रिल 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आबुधाबी देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत का हे जाणण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने पंतप्रधान कार्यालयाच्या पीएमओ वेबसाईटवर माहिती पडताळली. पीएमओ कार्यालयाच्या ऑफिशिअल वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 20 एप्रिल 2019 रोजी कोणताही परदेश दौरा आयोजित करण्यात आलेला नाही. पंतप्रधान मोदी यांनी 21-22 फेब्रुवारी 2019 रोजी नंतर कोणताही परदेश दौरा केलेला नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने भारतात (देशांतर्गत) विविध दौरे केल्याचे अपडेट 11 एप्रिल 2019 पर्यंतचे दिले आहेत.

परदेश दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी । पीएमओ कार्यालयअर्काईव्ह

भारत (देशांतर्गत) दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी । पीएमओ कार्यालयअर्काईव्ह

20 एप्रिल 2019 रोजी आबुधाबीमध्ये पहिल्या हिंदू मंदिरबाबत नेमके काय होणार?

आबुधाबी येथे निर्माण होणाऱ्या पहिल्या हिंदू मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम 20 एप्रिल 2019 रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बीएपीएस स्वामीनारायण मंदिराचे वर्तमान गुरु आणि अध्यक्ष महंत स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत होणार आहे. अध्यात्मिक गुरु महंत स्वामी महाराज हे युएई (आबुधाबीमध्ये) 18 ते 29 एप्रिल दौऱ्यावर आहेत.

नवभारत टाईम्स अर्काईव्ह  (11 फेब्रुवारी 2019)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आल्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 20 एप्रिल 2019 रोजी आबुधाबीला जाणार नसून, बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे वर्तमान अध्यक्ष महंत स्वामी महाराज जाणार आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट तारीख लक्षात ठेवा 20 एप्रिल 2019 ! अबूधाबी मधील हे पहिले भव्य हिंदू मंदिर. या मंदिराचे उदघाटन आपले #प्रिय पंतप्रधान- नरेंद्र मोदी करणार आहेत, या विषयावर संशोधन केल्यानंतर या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेला मजकूर चुकीच्या संदर्भाने देण्यात आला आहे. तसेच पोस्टमध्ये दाखविण्यात आलेला आबुधाबीमधील पहिल्या मंदिराचा फोटो हा मुळ दिल्ली स्थित अक्षरधाम मंदिराचा आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट तारीख लक्षात ठेवा 20 एप्रिल 2019 ! अबूधाबी मधील हे पहिले भव्य हिंदू मंदिर. या मंदिराचे उदघाटन आपले #प्रिय पंतप्रधान- नरेंद्र मोदी करणार आहेत, या विषयावर संशोधन केल्यानंतर या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेला मजकूर चुकीच्या संदर्भाने देण्यात आला आहे. तसेच पोस्टमध्ये दाखविण्यात आलेला आबुधाबीमधील पहिल्या मंदिराचा फोटो हा मुळ दिल्ली स्थित अक्षरधाम मंदिराचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 20 एप्रिल 2019 रोजी आबुधाबीमध्ये जाणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट तारीख लक्षात ठेवा 20 एप्रिल 2019 ! अबूधाबी मधील हे पहिले भव्य हिंदू मंदिर. या मंदिराचे उदघाटन आपले #प्रिय पंतप्रधान- नरेंद्र मोदी करणार आहेत ही पोस्ट खोटी आहे.

Avatar

Title:अबूधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False