सत्य पडताळणी : बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा मृतदेहांचा खच अजूनही घटनास्थळी पडून

असत्य शीर्षक | False Headline आंतरराष्ट्रीय

बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा मृतदेहांचा खच अजूनही घटनास्थळी पडून असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले होते. एबीपी माझाने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. हे वृत्त सत्य आहे का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे.  

आक्राईव्ह लिंक

एबीपी माझाने त्यांच्या फेसबुक पेजवरही ही बातमी शेअर केली आहे. या पोस्टला 11 हजार लाईक्स आहेत. या पोस्टवर 426 प्रतिक्रिया उमटल्या असून 544 जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा मृतदेहांचा खच अजूनही घटनास्थळी पडून आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही defence.pk या संकेतस्थळावर आम्ही गेलो. या संकेतस्थळाने इटलीतील पत्रकार फ्रांसेस्का मरिनो यांचा हवाला देत घटनास्थळापासून पाकिस्तानच्या लष्कराने 35 मृतदेह हलविले असल्याचे म्हटले आहे. या ठिकाणी मृतदेहाचा खच पडून असल्याचे या वृत्तात कुठेही म्हटलेले नाही.

आक्राईव्ह लिंक

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने 7 मार्च रोजी एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार घटनास्थळास भेट देण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखण्यात येत आहे. रॉयटर्सने या मदरशाचा काही अंतरावरुन घेण्यात आलेला एक फोटो मात्र प्रसिध्द केला आहे. या वृत्तातही दहशतवाद्याचे मृतदेह घटनास्थळी पडून असल्याचे कुठेही म्हटलेले नाही.

आक्राईव्ह लिंक

एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही याबाबत काहीही म्हटलेले नाही. त्यांनी आम्ही टार्गेट हिट केले आम्ही नेमके किती दहशतवाद्यांना यमसदनी धाडले याची मोजदाद केली नसल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओत तुम्ही 4 वाजून 06 सेकंद ते 4 वाजून 29 सेकंदापर्यंत हे सविस्तरपणे ऐकू शकता.

रिपब्लिकन टीव्हीने बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात यश आल्याचे म्हटले आहे. या हवाई हल्ल्यातील दहशतवाद्याचे मृतदेह जाळण्यात आल्याचा एक ऑडिओ या वृत्तवाहिनीने जारी केला आहे. या ऑडिओच्या सत्यतेबाबत मात्र कोणतीही खात्री देण्यात आलेली नाही. अनेकांनी याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. या ऑडिओतही कुठेही दहशतवाद्याचे मृतदेह घटनास्थळी पडून असल्याचे म्हटलेले नाही.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा मृतदेहांचा खच अजूनही घटनास्थळी पडून असल्याच्या वृत्ताला कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. भारत सरकारच्या कोणत्याही विभागानेही याला दुजोरा दिलेला नाही. रिपब्लिकन टीव्हीने दहशतवाद्यांचे मृतदेह जाळण्यात आल्याचा आणि नदीत प्रवाहित करण्यात आल्याचा दावा केला आहे. ऑडिओ टेपखेरीज कोणताही दुरावा पुरावा यासाठी उपलब्ध झालेला नाही. ऑडिओ टेपची सत्यतेबद्दल कोणतीही खात्री देता येत नाही. एबीपी माझाच्या दाव्यासाठी कोणताही पुरावा नाही. त्यामुळे फॅक्ट क्रिसेंडोच्या पडताळणीत या वृत्ताचे शीर्षक चुकीचे असल्याचे आढळून आले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा मृतदेहांचा खच अजूनही घटनास्थळी पडून

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: FALSE HEADLINE/चुकीचे शीर्षक