हा फोटो मुंबईतील स्वामी समर्थांच्या पादुकांचा नाही. जाणून घ्या यामागचे सत्य

False सामाजिक

(Source: तोचि एक समर्थ/Facebook)

फेसबुकवरील एका फेसबुक पेजवरून अपलोड केलेला स्वामी समर्थ आणि त्यांच्या पादुकांचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा मुंबईतील महालक्ष्मी परिसरातल्या श्री स्वामी समर्थ मठाचा हा अतिशय जुना व दुर्मिळ फोटो आहे. ही पोस्ट तुम्ही खाली पाहू शकता. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

अर्काइव्ह

तोचि एक समर्थ नावाच्या फेसबुक पेजवरून 22 मार्च 2019 रोजी वरील पोस्ट करण्यात आली होती. पडताळणी करेपर्यंत या पोस्टला 2400 पेक्षा जास्त लाईक्स आणि 524 वेळा शेयर करण्यात आले. पोस्टमध्ये लिहिले आहे की, मुंबईतील महालक्ष्मी परिसरातल्या श्री स्वामी समर्थ मठाचा हा अतिशय जुना व दुर्मिळ फोटो. या मठामध्ये स्वामींनी मुखातून काढून दिलेल्या आत्मलिंग पादुका आहेत. हा मठ फक्त गुरुवारीच भाविकांना दर्शनासाठी खुला असतो. हा दुर्मिळ फोटो असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे “स्वामी दर्शन” पोहोचवा.

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील स्वामी समर्थ मठाचा गुगलवर शोध घेतला. तेव्हा आई आर्यदुर्ग नावाच्या युट्यूब चॅनेलवरील वरील एक व्हिडियो आढळला. या व्हिडियोतील माहिती आणि पोस्टमधील कॅप्शनमध्ये दिलेली माहिती सारखी असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, या मठामध्ये स्वामींच्या आत्मलिंग पादुका आहेत, हा मठ केवळ गुरुवारीच भाविकांसाठीच उघडा असतो. व्हिडियोमध्ये समुद्रा शेजारील या मठाचा पत्ता मोना अपार्टमेंट, महालक्ष्मी असा दिला आहे.

पोस्टमधील फोटो एका गुहेतील आहे, तर व्हिडियोमध्ये दिसणारा हा मठ समुद्रा शेजारील एका अपार्टमेंट इमारतीच्या कम्पाउंडमधील दिसतो. येथे गुहा दिसत नाही. पोस्टमधील एका यूजरने हा फोटो कर्दळीवन येथील असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आम्ही कर्दळीवनाचा शोध घेतला.

श्री दत्त महाराज या वेबसाईटवरील माहितीनुसार, आंध्रप्रदेशातील ‘कर्दळीवन’  या स्थानाला दत्त संप्रदायात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. कर्दळीवन हे श्रीदत्तगुरूंचे गुप्त स्थान आणि श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान आहे. अन्य अनेक ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत. एवढे सर्व असूनही कर्दळीवनात जाणाऱ्यांचे प्रमाण फारच थोडे आहे.

मूळ लेख येथे वाचा – श्री दत्त महाराजअर्काइव्ह

वासूदेव शाश्वत अभियान युट्यूब चॅनेलवर कर्दळीवनाविषयीचा एक व्हिडियो आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता

या व्डिडियोमध्ये पोस्टमधील फोटोशी साम्य असणारी फ्रेम 4.43 वर आढळली. दोहोंची तुलना केली असता हा मूळ फोटो कर्दळीवनातील असल्याचे सिद्ध होते.

कर्दळीवनातील स्वामींची मूर्ती व पादुकांचा वेगळ्या अँगलचे फोटो तुम्ही खाली पाहू शकता.

कर्दळीवन विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही येथे भेट देऊ शकता – Kardalivan: Mini DVD

मग मुंबईतील महालक्ष्मी परिसरातल्या श्री स्वामी समर्थ मठाचा अतिशय जुना व दुर्मिळ फोटो कोणता? हा प्रश्न उरतोच.

फेसबुकवर यासंबंधी शोध घेतला असता श्री स्वामी समर्थ भक्त परिवार या फेसबुक पेजवरून खालील फोटो 11 डिसेंबर 2012 रोजी शेयर करण्यात आला होता. यामध्येदेखील वरीलप्रमाणे सारखीच कॅप्शन आहे.

अर्काइव्ह

Sri Swami Samarth Maths In And Around Mumbai – Amit Samant या फेसबुक पेजवर मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील या मठाविषयी माहिती देण्यात आली आहे आहे. यानुसार, महालक्ष्मी मंदिरापासून हा मठ पायी केवळ 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. श्री. अगसकर यांनी हा मठ 1792 साली उभारण्यात आला होता. स्वामींनी आपल्या मुखातून काढलेल्या आत्मलिंगी पादुका आगसकर यांनी दिल्या होत्या. या पादुका या मठात ठेवण्यात आलेल्या आहेत. हा मठ गुरुवारी सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेदरम्यान भाविकांसाठी सुरू असतो.

अर्काइव्ह

अशीच माहिती स्वामी दर्शन या वर्डप्रेस ब्लॉगवरदेखील आढळते – स्वामी दर्शनअर्काइव्ह

महालक्ष्मी परिसरातील या स्वामी समर्थ मठाचे लोकेशन येथे पाहा – गुगल मॅप

निष्कर्ष

फेसबुकवर शेयर करण्यात येणारा फोटो मुंबईतील स्वामी समर्थ मठातील नसून आंध्रपदेशातील कर्दळीवन येथील आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:हा फोटो मुंबईतील स्वामी समर्थांच्या पादुकांचा नाही. जाणून घ्या यामागचे सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False