चंद्रयान-३: चंद्रावरून पृथ्वी दिसण्याचा तो व्हायरल व्हिडिओ बनावट; वाचा सत्य

False Social

चंद्रयान-3 चे विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते हे दाखविण्यात आले आहे. दावा केला जात आहे की, चंद्रयान-3 ने हा व्हिडिओ काढला आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ इस्रो किंवा चंद्रयान-3 मोहिमेशी संबंधित नाही. चुकीच्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ? 

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना लिहितात की, “चंद्रयान-३ मिशन: चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचे नयनरम्य दृश्य.

मूळ व्हिडिओ – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर द इनफिनिट मॅडनेस या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ आढळला. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये हा व्हिडिओ अॅनिमेशनद्वारे तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे. 

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम

तसेच हा व्हिडिओ द इनफिनिट मॅडनेसच्या युट्यूब चॅनलवरदेखील उपलब्ध आहे. ज्यामध्ये एका युजरने असे लिहिलेले की, ‘हा व्हिडिओ एडिटे जरी असला तरी चांगला आहे.

मूळ पोस्ट – युट्यूब

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, 17 ऑगस्ट रोजी चंद्रयान-३ च्या मुख्य यानापासून विक्रम लँडरचे विलगीकरण झाले.

बीबीसीच्या बातमीनुसार सध्या विक्रम लँडर चंद्राच्या कक्षेत फिरत असून योग्य जागेवर उतरण्यासाठी त्या भूभागाचे फोटो आणि व्हिडिओ काढत आहे.

इस्रोने विक्रम लँडरने चंद्राचे काढलेले काही व्हिडिओ आपल्या अधिकृत वेबसाईवर शेअर केले आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या युट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ उपलब्ध आहेत.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ इस्रो किंवा चंद्रयान-3 मोहिमेशी संबंधित नाही. चुकीच्या दाव्यासह कॉम्प्युटर ग्राफिक्सद्वारे तयार करण्यात आलेला व्हिडिओ व्हायरल होते आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:चंद्रयान-३: चंद्रावरून पृथ्वी दिसण्याचा तो व्हायरल व्हिडिओ बनावट; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False