
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भेट देण्यासाठी मज्जाव करीत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. त्यामुळे सध्या त्या चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी एका रुममध्ये काँग्रेस पक्षाचिन्हाची रांगोळी झाडताना दिसतात.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ बनावट आहे.
काय आहे दावा?
प्रियंका गांधी एका खोलीतील फरशीवरील काँग्रेसच्या पक्षचिन्हाच्या डिझाईनची रांगोळी झाडताना दिसतात.
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे तपासले. कीवर्ड्स सर्चच्या माध्यमातून पत्रकार नरेंद्रनाथ मिश्र यांनी शेअर केलेला व्हिडिओ आढळला.
या व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी खोलीत झाडून घेताना दिसतात. परंतु, व्हिडिओत फरशीवर काँग्रेसच्या पक्षचिन्हाच्या डिझाईनची रांगोळी नाही.
याविषयी अधिक माहिती घेतल्यावर लोकसत्ताची बातमी आढळली. त्यानुसार, प्रियांका गांधी रविवारी (३ ऑक्टोबर) रात्री उशिरा लखनऊहून लखीमपूर खेरीला रवाना झाल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना सीतापूरमध्ये ताब्यात घेतले.
दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांनी डिटेन्शन रुममध्ये झाडू घेऊन साफसफाई केली. यावेळी हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता.
ALSO READ
प्रियंका गांधी यांनी केरळमध्ये गळ्यात क्रॉस घालून मते मागितली?
प्रियंका गांधी यांनी लहान मुलांना मोदींविरोधात शिवराळ घोषणा देण्यास उद्युक्त केले का?
व्हायरल व्हिडिओ आणि ओरिजनल व्हिडिओ यांची तुलना केलेली आहे. यावरून स्पष्ट होते की, प्रियंका गांधी यांच्या खोलीमध्ये झाडू मारतानाच्या व्हिडिओला डिजिटली एडिट करण्यात आले आहे.
निष्कर्ष
प्रियंका गांधी यांनी काँग्रेसच्या पक्षचिन्हाच्या डिझाईनची रांगोळी झाडूने साफ केली नव्हती. त्यांच्या व्हिडिओला छेडछाड करून बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:प्रियंका गांधी यांचा काँग्रेस पक्षचिन्हाची रांगोळी झाडतानाचा व्हिडिओ बनावट
Fact Check By: Agastya DeokarResult: Altered
