Fact : रानू मंडल यांचा मेकअप केलेला हा फोटो बनावट

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

प्रसिध्द गायिका रानू मंडल यांचे एक मेकअप केलेले छायाचित्र सध्या समाजमाध्यमात चांगलेच पसरत आहे. मंदार चक्रदेव यांनी हा फोटो पोस्ट करत म्हटले आहे की,  

राणू मंडल यांच्या जादा रंगरंगोटी केल्याविषयी ज्यांना विशेष कौतुक वाटते ती हीच लोका आहेत जी सकाळी उठून घुबडाचे दर्शन घेऊन किती मस्त वाटले मानणारी आहेत. तळटीप- instagram वर photo वर effects टाकणे वेगळे आणि स्वतः सिल्व्हर कलरने तोंड रंगवून हिडीस दिसणे वेगळे दोन्ही मध्ये खूप तफावत आहे. आम्हाला सौंदर्यदृष्टी समजते. मंडलबाईंचे दिसणे हा विषय अजिबात नाही ते कोणाच्या हातात नसते पण हिडीस मेकअप करू नये ही अक्कल असावी. 

या छायाचित्राबाबत या पोस्टखाली आणि समाजमाध्यमात प्रतिक्रिया दिली आहे. हे छायाचित्र खरे आहे का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Mandar Chakradeo FB Post On Ranu Mandal.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट 

तथ्य पडताळणी 

रानू मंडल यांच्या चेहऱ्यावर खरोखरच मेकअप करण्यात आला होता का, याबाबतचे वृत्त शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला एएम न्यूज या संकेतस्थळावरील 17 नोव्हेंबर 2019 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तात रानू मंडलने एका कार्यक्रमात भाग घेतला आणि रॅम्प वॉक केल्याचे म्हटले आहे. तिथे रानूने कोणत्या प्रकारचा मेकअप केला त्यावरुन ट्रोल करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

amnews.live.png

एएम न्यूजने दिलेले सविस्तर वृत्त / Archive

लेटेस्टली मराठीनेही रानू मंडल हिचे गोल्डन रंगाच्या मेकअपमधील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याचे म्हटले आहे. रानू हिच्यावर करण्यात आलेला हा मेकअप तिच्यावर जास्तच भारी पडल्याने तिची खिल्ली उडवली जात असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. 

marathi.latestly.com-2019.11.23-14_12_29.png

लेटेस्टली मराठीचे सविस्तर वृत्त / Archive 

त्यानंतर आम्हाला अमर उजाला या हिंदी दैनिकाने दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात रानू मंडल यांच्या मेकअफ आर्टिस्ट संध्या यांनी एक व्हिडिओ शेअर करत रानू मंडल यांचा मेकअप कशा पध्दतीने करण्यात आला होता. हे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे समाजमाध्यमात पसरत असल्याचे छायाचित्र बनावट असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर संध्या यांच्या इन्स्टाग्राम खात्यास आम्ही भेट दिली त्याठिकाणी आम्हाला खालील व्हिडिओ दिसून आला.

https://www.instagram.com/tv/B4-T3k_gwIY/

Archive

संध्या यांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर रानू मंडल यांच्या खऱ्या मेकअप केलेल्या छायाचित्राची आणि बनावट छायाचित्राची तुलनाही केली आहे. हे आपण खाली पाहू शकता.

https://www.instagram.com/p/B5CpwQWArdN/

Archive

इन्स्टाग्रामवरचे हे खाते व्हेरिफाईड नसल्याने आम्ही मेकअप आर्टिस्ट संध्या गुप्ता यांचे पती आणि संध्याजमेकओव्हरचे मालक रतनकुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, रानू मंडल या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा मेकअप करण्यात आला होता. त्यांच्या त्वचेला अनुरुप असेल असाच मेकअप करण्यात आला होता. काही जणांनी मात्र बनावट छायाचित्र तयार करुन ते समाजमाध्यमात पसरवले. त्यामुळे आम्हाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 

निष्कर्ष 

रानू मंडल यांनी कानपूर येथे एका उद्घाटनाच्या कार्यक्रमास गेले असताना मेकअप केला होता. त्यावेळच्या छायाचित्रात फेरफार करुन ती चुकीच्या पध्दतीने समाजमाध्यमात पसरविण्यात आली. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact : रानू मंडल यांचा मेकअप केलेला हा फोटो बनावट

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •