भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघादरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला नागपूर येथे 9 फेब्रुवारी रोजी सुरूवात होत आहे. या सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघ तीन फेब्रुवारीलाचा नागपूर येथे दाखल झाला. या बहुप्रतिक्षेत सामन्याला मात्र एका वेगळ्याच्या वादाची किनार लागली आहे.

भारतीय संघ नागपुरच्या हॉटेलमध्ये दाखल झाल्यावर तेथील स्टाफने त्यांचे टिळा लावून स्वागत केले. याप्रसंगाचा व्हिडिओ शेअर करून अनेकांनी संघातील दोन मुस्लिम खेळाडुंनी टिळा लावण्यास नकार दिला म्हणून त्यांच्यावर टीका केली.

सुदर्शन टीव्ही चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी मोहम्मद सिराज और उमरान मलिक या दोन खेळाडुंना त्यांच्या धर्माविषयी ‘कट्टर’ असल्याची टिपण्णी केली. 

https://twitter.com/SureshChavhanke/status/1621484929485008896

महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राच्या फेसबुक पेजवरूनसुद्धा हा व्हिडिओ शेअर करून या मुस्लिम खेळाडुंना लक्ष्य करण्यात आले.

हा व्हिडिओ शेअर करून म्हटले की, “भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराज आणि उमरान मलिकनं कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल”

मूळ पोस्ट – फेसबुक

‘ट्रोल’कऱ्यांनी या व्हिडिओला धार्मिक रंग देत या खेळाडुंवर तोंडसुख घेतले. वृत्त मीडियानेसुद्धा यात भर घातल्याने या व्हिडिओचे पूर्ण सत्य समोर येणे अधिक गरजेचे आहे.

तथ्य पडताळणी

45 सेकंदाच्या या क्लिपमध्ये दिसते की, भारतीय संघातील खेळाडू हॉटेलमध्ये दाखल होताच झाल्यावर तेथील स्टाफ टाळ्या वाजवून व कपाळावर टिळा लावून स्वागत करतात. आधी मोहम्मद सिराज टिळा न लावता जातो व त्यानंतर उमरान मलिकही टिळा लावून घेण्यास मनाई करतो.

सदरील व्हिडिओ नीट पाहिल्यावर कळते की, या दोन खेळाडुंशिवाय आणखी दोन जणांनी टिळा लावून घेतला नाही.

मोहम्मद सिराजच्या पाठोपाठ संघाचे कामगिरी विश्लेषक हरीप्रसाद मोहन टिळा न लावताच निघून गेले होते.

यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड टिळा लावून पुढे जातात. त्यांच्या मागे लगेच फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड टिळा लावण्यास नकार देतात.

म्हणजे केवळ मुस्लिम खेळाडुंनीच टिळा लावण्यास नकार दिला असे नाही. महाराष्ट्र टाईम्सच्या फेसबुक पोस्ट खाली अनेक युजर्सने या व्हिडिओला विनाकारण धार्मिक रंग देण्यावरून टीक केली आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, टिळा न लावण्याच्या या व्हिडिओवरून केवळ मुस्लिम खेळाडुंना लक्ष्य केले जात आहे. मुळात या व्हिओत एकून चार जणांनी टिळा लावला नव्हता ज्यापैकी दोघे मुस्लिम नव्हते. हा व्हिडिओ शेअर करताना ही अधिक माहिती देणे गरजेचे आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मुस्लिम खेळाडुंनी टिळा न लावल्याच्या व्हिडिओला विनाकारण दिला गेला धार्मिक रंग; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: Missing Context