नासाने चंद्रयान-3 चंद्रावर उतरतानाचा व्हिडिओ जारी केला नाही; अॅनिमेशन क्लिप व्हायरल
इस्रोची महत्त्वकांक्षी चंद्रयान-3 मोहिम यशस्वी ठरली. 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षित उतरले. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, अमेरिकेच्या नासाने चंद्रयान-3 चंद्रावर उतरतानाचा व्हिडिओ जारी केला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ नासाने जारी केलेला नाही आणि तो चंद्रयान-3 मोहिमेशीसंबंधित नाही.
काय आहे दावा?
चंद्रावर उतरणाऱ्या यानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, “चंद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग, शेवटच्या काही मिनिटांचा थरार.भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. सौजन्य – नासा.”
मूळ व्हिडिओ – फेसबुक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हिडिओची बारकाईने तपासणी केल्यावर त्यात "Houston, Tranquility Base here. The Eagle has landed" असे वाक्य ऐकू येते.
कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, प्रसिद्ध अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी हे वाक्य म्हटले होते. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या आर्मस्ट्राँग यांनी अपोलो-11 मोहिमेअंतर्गत 20 जुलै 1969 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर हे उद्गार काढले होते.
नासाच्या वेबसाईटवर अपोलो-11 मोहिमेतील संवादाची ऑडिओ फाईल आणि लिखित तपशील उपलब्ध आहेत.
व्हायरल व्हिडिओच्या शेवटी आपण ऐकू शकतो की - "Roger, Tranquility. We copy you on the ground. You got a bunch of guys about to turn blue. We're breathing again. Thanks a lot."
मूळ वेबसाईट – नासा
मग प्रश्न पडतो की, नासा का बरं अपोलो-11 मोहिमेचा आवाज या कथित चंद्रयान-3 च्या क्लिपमध्ये वापरेल?
गुगल रिव्हर्स इमेस सर्च केल्यावर युट्यूबवर 2021 साली अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ सापडला. याच युट्यूब व्हिडिओतून व्हायरल क्लिप घेतलेली आहे.
Haze Gray Art नामक या चॅनेलवरील या व्हिडिओच्या शीर्षकात स्पष्ट म्हटले आहे की, हा व्हिडिओ अपोलो-11 चंद्रावर उतरतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचा अधिक लांबीचे व्हर्जन येथे पाहू शकता.
Haze Gray Art चॅनेलवर अवकाश मोहिमांविषयक व्हिडिओ शेअर केले जातात.
मूळात हा व्हिडिओदेखील अपोलो-11 चंद्रावर उतरतानाचा खरा व्हिडिओ नाही. हे केवळ अॅनिमेशन आहे.
Haze Gray Art नामक कलाकाराने 2018 साली ट्विटरवर स्पष्ट केले होते की, तो कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या मदतीने अॅनिमेशन व्हिडिओ तयार करतो. थोडक्यात काय तर हा व्हिडिओ म्हणजे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन आहे.
चंद्रयान-3 खरा व्हिडिओ
गेल्या महिन्यात आंध्र प्रदेशमधील सतीश धवन स्पेस सेंटर येथून चंद्रयान-3 ने उड्डाण केले होते. सुमारे चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले.
इस्रोच्या अधिकृत ट्विटर चंद्रयान-3 चंद्रावर उतरत असतानाचा खरा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.
निष्कर्ष
यावरू स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ चंद्रयान-3 चा नाही. तो एक अॅनिमेशन व्हिडिओ असून त्यामध्ये अपोलो-11 चंद्रावर उतरताना दाखविले आहे. चंद्रयान-3 किंवा नासा यांच्याशी त्याचा संबंध नाही.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:नासाने चंद्रयान-3 चंद्रावर उतरतानाचा व्हिडिओ जारी केला नाही; अॅनिमेशन क्लिप व्हायरल
Written By: Agastya Deokar
Result: False