इंदिरा गांधींची गाडी चेक केली तर किरण बेदीला अवॉर्ड मिळाला का? : सत्य पडताळणी

False राजकीय

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गाडी चेक केली तर किरण बेदीला अवॉर्ड मिळाला असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत या पोस्टला मराठी या फेसबुक पेजवरुन 797 शेअर, 2 हजार 400 लाईक्स, 254 कमेंटस् मिळाल्या आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये इंदिरा गांधींची गाडी चेक केली तर किरण बेदीला अवॉर्ड दिला होता, मोदींचं हेलीकॉप्टर चेक केलं तर अधिकाऱ्याला निलंबित केलं. ये है नवभारत.. असे लिहिले आहे. याविषयी सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने गुगलवर किरण बेदी यांनी इंदिरा गांधी यांची कार चेक केली होती का असे सर्च केले.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये उल्लेख केलेली घटना ही 1982 या काळातील आहे. या घटनेबद्दल स्वतः किरण बेदी यांनी ट्विटर अकाउंटवर 22 एप्रिल 2019 रोजी ट्विट केले आहे.

अर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये लिहिले असल्याप्रमाणे किरण बेदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कार चेक केली आहे, त्यानंतर त्यांना अवॉर्ड मिळाला असा दावा केला आहे. परंतू मुळात किरण बेदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कार चेक केलेली नाही. या विषयावर विविध माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.

काय किरण बेदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कार चेक केली?

  • किरण बेदी यांनी कधीही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कार चेक केली नाही.
  • माजी पंतप्रधान यांची कार चेक केली नसून, चुकीच्या ठिकाणी पार्क करण्यात आली असल्याने त्यासाठी दंड आकारण्यात आला होता.

 खाली दिलेल्या लिंकवर आपण यासंदर्भात सविस्तर बातम्या वाचू शकता.

एनडीटीव्हीअर्काईव्ह

नवभारत टाईम्सअर्काईव्ह

लाईव्ह हिंदूस्तानअर्काईव्ह

या घटनेनंतर किरण बेदी यांना अवॉर्ड मिळाला का?

या घटनेनंतर किरण बेदी यांना कोणताही अवॉर्ड मिळालेला नाही. याउलट त्यांची आणि पोलिस उपनिरिक्षकाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारचे चालान कट केले त्या दोघांचीही बदली करण्यात आली. खाली दिलेल्या लिंकवर आपण याविषयी सविस्तर वृत्त वाचू शकता.

एनडीटीव्हीअर्काईव्ह

किरण बेदी यांना इंदिरा गांधी यांची कार चेक केली म्हणून अवॉर्ड मिळाला का?

किरण बेदी यांना इंदिरा गांधी यांची कार चेक केली म्हणून कोणताही अवॉर्ड मिळालेला नाही. परंतू किरण बेदी यांची पोलीस खात्यातील कारकिर्द आणि देशासाठी बजावलेली कर्तव्यतत्परता या त्यांच्या कामाची दखल घेवून विविध पुरस्कार त्यांना देण्यात आले आहेत. तसेच 2002 या वर्षी त्यांना वुमन ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे किरण बेदी यांनी इंदिरा गांधी यांची कार चेक केलेली नाही. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कार चेक केली म्हणून त्यांना कोणताही अवॉर्ड मिळालेला नाही. किरण बेदी यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

आज तकअर्काईव्ह

किरण बेदी यांनी स्वतःची जडण-घडण, स्वतःची पोलीस विभागातील कारकीर्द आणि इतर अनेक गोष्टींबद्दल टेड या युट्युब चॅनलवर 13 डिसेंबर 2010 व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांची गाडी चेक केली या व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील दावा कसा खोटा आहे याविषयी  04.00 ते 04.28 सेकंदापर्यंत दिलेली माहिती आपण पाहू शकता.

अर्काईव्ह  

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये किरण बेदी यांनी इंदिरा गांधी यांची गाडी चेक केली म्हणून किरण बेदीला अवॉर्ड मिळाला असा दावा करण्यात आला आहे. मुळात 1982 या वर्षी माजी पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असताना, पंतप्रधानांची गाडी दुरुस्ती कारणास्तव दिल्लीमध्ये एका ठिकाणी पार्क करण्यात आल्यानंतर, दिल्लीतील पोलीस उपनिरीक्षकाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कार चुकीच्या ठिकाणी पार्क करण्यात आल्याच्या कारणास्तव दंड आकारला होता. तसेच इंदिरा गांधी यांची कार चेक केली म्हणून किरण बेदी यांना अवॉर्ड मिळाला हे तथ्य खोटे असून, किरण बेदी यांनी केलेल्या कामासाठी त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील तथ्य हे खोटे आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये इंदिरा गांधींची गाडी चेक केली तर किरण बेदीला अवॉर्ड दिला होता असा दावा करण्यात आला आहे. परंतू मुळात इंदिरा गांधी यांची गाडी किरण बेदी यांनी चेक केली नव्हती, मुळात गाडी चेकच करण्यात आली नव्हती तर चुकीच्या ठिकाणी पार्क केली म्हणून दंड आकारण्यात आला होता. तसेच किरण बेदी यांनी इंदिरा गांधी यांची गाडी चेक केली म्हणून त्यांना कोणताही अवॉर्ड देण्यात आलेला नाही. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील इंदिरा गांधींची गाडी चेक केली तर किरण बेदीला अवॉर्ड दिला होता हे तथ्य खोटे आहे.

Avatar

Title:इंदिरा गांधींची गाडी चेक केली तर किरण बेदीला अवॉर्ड मिळाला का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False