Fact Check : महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात हुंडा प्रथेचे समर्थन करण्यात आलंय का?

False राजकीय | Political सामाजिक

महाराष्ट्रातील अभ्यासक्रमांमध्ये हुंडा प्रथेचे समर्थन करण्यात आलंय, असा दावा Anil Dadwal यांनी एका पोस्टद्वारे केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात हुंडा प्रथेविषयी काही लिहिलेले आहे का आणि याबाबत काही वाद निर्माण झाला आहे का, हे शोधण्यासाठी गुगलवर अभ्यासक्रमात हुंडा असे शोधले. त्यावेळी आम्हाला एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे 2 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिध्द करण्यात आलेले खालील वृत्त दिसून आले. 

एबीपी माझा / Archive

म्हणजेच हे वृत्त आत्ताचे नसुन 2017 मधील असल्याचे स्पष्ट आहे. इंडिया डॉट कॉम या मराठी संकेतस्थळानेही 3 फेब्रुवारी 2017 रोजी हे वृत्त प्रसिध्द केले आहे. ते आपण खाली पाहू शकता.

इंडिया डॉट कॉम / Archive

इंग्रजीमध्ये advantages of dowry system असे सर्च केल्यावर आम्हाला द टाईम्स ऑफ इंडियाचे 21 ऑक्टोबर 2017 चे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार सेंट जोसेफ कॉलेज, शांती नगर, बंगळुरू येथील सामाजिक शास्त्राच्या 60 विद्यार्थ्यांना अभ्यास म्हणून जे साहित्य देण्यात आले होते. त्यात या पानाचा समावेश होता. या बातमीत सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात येत असलेले पानही दिसून येते. 

द टाईम्स ऑफ इंडिया / Archive

द न्यूज मिनिट (Archive) या संकेतस्थळानेही याबद्दलचे वृत्त 20 ऑक्टोबर 2017 रोजी दिले आहे. त्यांनी कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी सुरुवातीला यावर भाष्य करण्यास नकार दिला. त्यानंतर हा भाग अभ्यासात असल्याचे मान्य करत अशा मतांशी कॉलेज प्रशासन सहमत नसल्याचे सांगत याबाबत योग्य ती चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. दरम्यान भारतात हुंडा देणे-घेणे कायद्याने गुन्हा आहे.

निष्कर्ष

महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात हुंडा प्रथेविषयी दिलेली माहिती म्हणून पसरविण्यात येत असलेले पान हे 2017 मधील बंगळुरू येथील शांती नगर मधील सेंट जोसेफ कॉलेजच्या समाजशास्त्रच्या अभ्यासातील आहे. त्याचा महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात हुंडा प्रथेचे समर्थन करण्यात आलंय का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False