सोमनाथ मंदिरात प्रवेशापासून काही समाजघटकांना रोखण्यात आल्याची घटना जुनी; वाचा सत्य

Partly False सामाजिक

गुजरातमधील सोमनाथ मंदिरात प्रवेशापासून काही समाजघटकांना रोखण्यात आल्याचा दावा करत समाजमाध्यमात एक वृत्तपत्राचे कात्रण व्हायरल होत आहे. सोमनाथ मंदिरात प्रवेश करण्यास खरोखरच काही समाजघटकांना रोखण्यात आले आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

screenshot-www.facebook.com-2020.08.18-18_51_43.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाण्यास काही समाजघटकांना बंदी घातली आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी जनसत्ता ऑनलाइनने 21 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित केलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार त्यावेळी कोणीतरी असा फलक लावला होता. परंतू तो हटविण्यात आला. 

screenshot-www.jansatta.com-2020.08.18-19_19_30.png

जनसत्ता / संग्रहित

द इंडियन एक्स्प्रेसच्या संकेतस्थळाने 21 ऑगस्ट 2019 रोजी दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात हा फलक लगेच काढून टाकला. याप्रकरणी काही युवकांनी माफी मागितल्याचे या वृत्तात म्हटलेले आहे. 

screenshot-indianexpress.com-2020.08.18-19_35_40.png

द इंडियन एक्स्प्रेस / संग्रहित

यातून हे स्पष्ट झाले की, अशी घटना गतवर्षी म्हणजेच ऑगस्ट 2019 मध्ये घडलेली असून ऑगस्ट 2020 मध्ये घडलेली नाही.

निष्कर्ष

गुजरातमधील सोमनाथ मंदिरात प्रवेशापासून समाजातील काही घटकांना ऑगस्ट 2020 मध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याचे असत्य आहे. अशा स्वरूपाचा फलक लावण्यात आल्याची घटना ऑगस्ट 2019 मध्ये घडली होती.

Avatar

Title:सोमनाथ मंदिरात प्रवेशापासून काही समाजघटकांना रोखण्यात आल्याची घटना जुनी; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Partly False