हा व्हिडिओ राजपूत महिलांनी दाखवलेल्या तलवारीच्या कौशल्याचा

False राजकीय | Political

दिल्लीतील शाहीनबाग येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात म्हणजेच सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी सुरू असणाऱ्या मुस्लीम  महिलांविरोधात कट्टर हिंदू महिला उभ्या राहिल्या आहेत, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उत्तम भोकरे यांनी असा दावा करत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरोखरच मुस्लीम  महिलांविरोधात आंदोलन करणाऱ्या कट्टर हिंदू महिलांचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कसला आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळे शब्दप्रयोग करत युटुयूबवर हा व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 23 ऑगस्ट 2019 रोजी अपलोड करण्या म्हटले असल्याचे दिसून आले.

त आलेला एक व्हिडिओ आम्हाला दिसून आला. या ठिकाणी शीर्षकात गुजरात मे 2000 से ज्यादा #क्षत्राणियों ने एक साथ तलवार बाजी करके #विश्व_रिकॉर्ड बनाया गुजरात असे म्हटले असल्याचे दिसून आले.

Archive

याच व्हिडिओचे 30 सेकंदाचे एक दीर्घ दृश्य 25 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिध्द करण्यात आल्याचे आम्हाला दिसून आले. याठिकाणी शीर्षकात ” गुजरात मे 2000 से ज्यादा राजपूत बहनों ने एक साथ तलवार बाजी करके विश्व रिकॉर्ड बनाया गुजरात राजपूत सम” | असे म्हटले असल्याचे दिसून आले. 

Archive

याबाबत द टाईम्स ऑफ इंडियाने 23 ऑगस्ट 2019 रोजी दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात जामनगर येथे दोन हजार राजपूत महिलांनी आपल्या तलवार कौशल्याचे दर्शन घडवत विश्वविक्रम प्रस्थापित केल्याचे म्हटले आहे.

Archive

याशिवाय VTv गुजराती न्यूज अॅन्ड बियॉन्ड या युटुयुबवरील वृत्तवाहिनीने प्रकाशित करण्यात आलेले एक वृत्तही दिसून आले. या वृत्तात जामनगर येथे तलवार रास खेळत दोन हजार राजपूत महिलांनी विश्वविक्रम बनवला आहे.

Archive

याशिवाय भास्कर समुहाच्या गुजराती भाषेत प्रकाशित होणाऱ्या दिव्य भास्कर (संग्रहण) दैनिकाच्या संकेतस्थळावरही याबाबतचे वृत्त आम्हाला दिसून आले. यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ राजपूत महिलांनी केलेल्या विश्वविक्रमाचा असून त्याचा शाहीनबाग येथील महिलांच्या आंदोलनाला विरोध करण्याशी कोणताही संबंध नाही.

निष्कर्ष 

हा व्हिडिओ राजपूत महिलांनी केलेल्या विश्वविक्रमाचा आहे. त्याचा शाहीनबाग येथील मुस्लीम महिलांच्या आंदोलनाला विरोध करण्याशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:हा व्हिडिओ राजपूत महिलांनी दाखवलेल्या तलवारीच्या कौशल्याचा

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False