36 वर्षांतून एकदाच फुलणारे हे “नागपुष्प” नाही. हा सी-पेन नावाचा सागरी प्राणी आहे. वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

निसर्गातील काही गोष्टी इतक्या अचाट आणि भन्नाट असतात की, त्यांना चमत्कार म्हणने अतिशयोक्ती ठरू नये. अशीच एक गोष्ट म्हणजे 36 वर्षांतुन एकदाच उमलणारे अत्यंत दुर्मिळ फूल. त्याचे नाव नागपुष्प सांगितले जाते. हिमालयाच्या कुशीत फुलणाऱ्या या फुलाचा फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. शेषनागाच्या रुपाशी साम्य असणारे हे फुल लोकांना भुरळ घालत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, हा दुर्मिळ नागपुष्प नावाच्या फुलाचा फोटो आहे. हे फुल हिमालयाच्या डोंगररांगात 36 वर्षांतून केवळ एकदाच उमलते. त्यामुळे हा फोटो जास्तीतजास्त शेयर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

तथ्य पडताळणी

सदरील फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, गेल्या अनेक वर्षांपासून हा फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे. हिमालयात आढळणारे व 36 वर्षांतून एकदाच येणार नागपुष्प म्हणून हा फोटो फिरवला जात आहे. परंतु, फोटो नेट वेबसाईटवर 2013 साली सर्वप्रथम हा फोटो अपलोड केल्याचे कळाले.

मूळ फोटो येते पाहा – Photo.Net

वेबसाईटवरील माहितीनुसार, गॉर्डन बी. बोब्रिक नावाच्या छायाचित्रकाराने हा फोटो काढला होता. त्याने हा फोटो सी-पेन/सी-फेदर (Sea Pen/Sea Feather) नावाच्या सागरी प्राण्याचा म्हटले आहे.

काय आहे सी-पेन?

समुद्र तळाशी आढळणारा हा अपृष्टवंशीय प्राणी असतो. ब्रिटानिका ज्ञानकोशानुसार, हा प्राणी अँथोझोआ कुळातील आहे. पक्षाच्या पिसाच्या पेनासारखा आकार असल्यामुळे त्याला सी-पेन असे म्हणतात. खोल समुद्राच्या तळाशी हा जीव आढळतो. दोन फुटापर्यंत त्यांची लांबी वाढू शकते.

सविस्तर माहिती येथे वाचा – ब्रिटानिकाइन्सायक्लोपीडिया

बीबीसी अर्थवरील ओशियन सीरिजमध्ये समुद्रतळाशी वस्ती करून राहणाऱ्या सी-पेन प्राण्यांचा व्हिडियो उपलब्ध आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

विविध रंग आणि आकाराचे सी-पेन तुम्ही काली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता.

स्नोप्सने सर्वप्रथम या फोटोची तथ्य पडताळणी केली होती.

निष्कर्ष

हिमालय पर्वतरांगांमध्ये 36 वर्षांनी उमलणारे फुल म्हणजेच “नागपुष्प” म्हणून जो फोटो व्हायरल होत आहे तो, मुळात समुद्रात राहणारा सी-पेन नावाचा प्राणी आहे. गॉर्डन बी. बोब्रिक नावाच्या छायाचित्रकाराने 2013 साली हा फोटो काढला होता.

Avatar

Title:36 वर्षांतून एकदाच फुलणारे हे “नागपुष्प” नाही. हा सी-पेन नावाचा सागरी प्राणी आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •