रोहित शर्मा आणि त्यांची पत्नी राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत का? : सत्य पडताळणी

False राजकीय

(संग्रहित छायाचित्र)

सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे, ज्या फोटोमध्ये भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका हे राष्ट्रवादी साठी प्रचार करत आहेत, असे लिहिलेले आहे. फेसबुकवर दादा धंजी थोरात या अकाउंटवरून ही पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने या पोस्टची केली सत्य पडताळणी.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीसाठी प्रचार करत आहेत का? याबद्द्ल सत्य शोधण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने व्हायरल होणाऱ्या फोटोची गुगलवर रिव्हर्स ईमेज केली. त्यानंतर हे स्पष्ट झाले की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो आणि प्रत्यक्षातील फोटो हे वेगवेगळे आहेत.

रोहित शर्मा यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर 21 फेब्रुवारी 2019 रोजी व्हायरल होणाऱ्या फोटोचा मुळ फोटो अपलोड करण्यात आलेला आहे. मुळ फोटोमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि त्यांची पत्नी यांनी दोघांनीही हातामध्ये घड्याळ घातलेले आहे. आणि त्या फोटोसंदर्भात इंग्रजीमध्ये Find a wife you can swap watches with असे लिहिलेले आहे.

अर्काईव्ह

रोहित शर्मा यांच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर देखील सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटोचा मुळ फोटो आढळून आलेला आहे. हा फोटो 22 फेब्रुवारी 2019 रोजी अपलोड करण्यात आला आहे.

रोहित शर्मा ऑफिशिअल फेसबुक अकाउंट

अर्काईव्ह

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो आणि मुळ फोटो या दोन्हीतील फरक आपण येथे बघू शकता. सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा एडिट केलेला असून, मुळ फोटोमध्ये कुठेही राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी प्रचार अशा संदर्भातील आशय आढळून येत नाही.

संपुर्ण संशोधनानंतर असे आढळून आले की सोशल मीडियावर व्हायरल होणारा रोहित शर्मा आणि त्यांच्या पत्नीचा फोटो आणि मुळ फोटो यामध्ये फरक आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा लोकसभा 2019 निवडणूकीच्या अनुषंगाने जाणीवपुर्वक एडिट करुन व्हायरल करण्यात येत आहे.   

भारतीय बीसीसीआय मुंबई येथील कार्यालयाशी फॅक्ट क्रिसेंडो टीमने संपर्क केला असता त्यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई कार्यालयाच्या चंद्रकांत एस. नाईक यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला असता, त्यांनी या विषयावर स्पष्टपणे अधिक माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयात फोन केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर संपर्क केल्यावर त्यांनी क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि त्यांच्या पत्नी हे राष्ट्रवादीसाठी प्रचार करत असल्याची माहिती 04 एप्रिल 2019 रोजी दुपारी 3.30 वाजेपर्यंत त्यांच्यापर्यंत आलेली नाही, असे सांगितले. कोणत्या मतदारसंघात प्रचार करत आहेत याबद्दलची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


नवाब मलिक,
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवक्ते
मुंबई

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो संदर्भात असे लिहिलेले आहे की, भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि त्यांची पत्नी रितीका हे राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत. परंतू मुळ फोटो आणि व्हायरल होणारा फोटो हे दोन्हीही फोटो वेगवेगळे आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा मुळ फोटोला एडिट करुन वापरण्यात आलेला आहे. म्हणूनच सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो असत्य आहे.

Avatar

Title:रोहित शर्मा आणि त्यांची पत्नी राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False