‘ठाकुरांचे रक्त गरम असते’ असे योगी म्हणाले नाही; तो स्क्रीनशॉट बनवाट आहे

Altered राजकीय

हाथरस प्रकरणामुळे जातीय व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच एक वादग्रस्त स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. आजतक वाहिनीचा भासणाऱ्या या कथित स्क्रीनशॉटमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ “ठाकुरांचे रक्त गरम असते, ठाकुरांकडून चुका होतच असतात” असे म्हणाल्याचे दिसते. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा स्क्रीनशॉट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. योगी आदित्यनाथ यांनी असे विधान केलेले नाही.

काय आहे दावा

व्हायरल होत असलेल्या फोटोनुसार आज तक चॅनलने बातमी केली की, “ठाकुरों का खून गर्म होता है, ठकुरों से गलतियां हो जाती हैं, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

Facebook | Archive 

तथ्य पडताळणी.

‘आजतक’च्या वेबसाईटवर अशी कोणतीही बातमी आढळली नाही. तसेच इतर मीडियानेसुद्धा योगी यांनी असे विधान केल्याची बातमी केलेली नाही. त्यामुळे या विधानाच्या विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित होते.

‘आजतक’च्या सोशल मीडियावर सर्च केल्यावर 2 ऑक्टोबर 2020 रोजीची एक पोस्ट आढळली. यामधील व्हिडिओ आणि व्हायरल पोस्ट यामध्ये कमालीचे साम्य आहे. 

Twitter | Archive 

या बातमीमध्ये कुठेही “ठाकुरों का खून गर्म होता है, ठकुरों से गलतियां हो जाती हैं, असे योगी आदित्यनाथ म्हणाले असा उल्लेख नाही. सदरील स्क्रीनशॉट ज्या फ्रेमवरून घेतला असेल त्याची मूळ फ्रेमशी तुलना करून स्पष्ट होते की, तो बनावट आहे.

‘आज तक’चे वरीष्ठ पत्रकार राहुल कंवल यांनीसुद्धा ट्विट करून खुलासा केला की, त्यांच्या वाहिनीने अशी बातमी दाखवलेली नाही. सदरील स्क्रीनशॉट बनावट आहे. 

Twitter | Archive 

निष्कर्ष 

ठाकुरों का खून गर्म होता है, ठकुरों से गलतियां हो जाती हैं,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले हा दावा खोटा आहे. आज तक वाहिनीचा तो स्क्रीनशॉट फोटोशॉप केलेले आहे. 

Avatar

Title:‘ठाकुरांचे रक्त गरम असते’ असे योगी म्हणाले नाही; तो स्क्रीनशॉट बनवाट आहे

Fact Check By: Milina Patil 

Result: Altered