त्रिपूरातील अलगीकरण कक्षाचा व्हिडिओ मुंबईतील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या डोमचे विलगीकरण कक्षात रुपांतर करण्यात आले आहे. या विलगीकरण कक्षात ‘लूंगी डान्स’ या हिंदी गाण्यावर काही जण नृत्य करत असल्याचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका वरळीतील NSCI चा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियातील विलगीकरण कक्षाचा हा व्हिडिओ आहे का, यांचा शोध घेतला. त्यावेळी मुंबई महापालिकेचे 10 जून 2020 रोजी सायंकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी एक ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये हा व्हिडिओ वरळीतील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियातील विलगीकरण कक्षाचा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ NSCI येथील विलगीकरण कक्षाचा असल्याचा दावा केला होता. 

संग्रहित

त्यानंतर 7 वाजून 53 मिनिटांनी मुंबई महापालिकेने पुन्हा दुसरे ट्विट केले. या ट्विटमध्ये इंडिया डॉट कॉम (संग्रहित) संकेतस्थळवरील एक वृत्त दर्शवत हा व्हिडिओ त्रिपुरातील असल्याचेही मुंबई महापालिकेने स्पष्ट केले. 

संग्रहित

त्रिपुरातील स्थानिक प्रसारमाध्यमांनीही हा व्हिडिओ युटूयूबवर अपलोड केला असून     हापनिया कोविड केअर सेंटरचा असल्याचा म्हटले आहे. न्यूज अपडेट त्रिपुराने 9 जून 2020 रोजी युटूयूबवर अपलोड केला असून तो आपण खाली पाहू शकता. 

संग्रहित

यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियातील विलगीकरण कक्षाचा नसून त्रिपुरातील आहे.

निष्कर्ष 

मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियातील विलगीकरण कक्षाचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ त्रिपुरातील आहे.

Avatar

Title:त्रिपूरातील अलगीकरण कक्षाचा व्हिडिओ मुंबईतील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False