फोटोमध्ये दाखविण्यात आलेली शौचालये बिहारमधील आहेत का? : सत्य पडताळणी

False सामाजिक

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये रस्त्याच्या कड्याच्या बाजूला काही शौचालये बांधण्यात आलेला एक फोटो आहे. या फोटोच्यावर मोदी सरकारद्वारा बिहारमध्ये बांधण्यात आलेली विश्वविक्रमी 8,50,000 शौचालये असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट महाराष्ट्र माझा – मनसे या फेसबुक पेजवरुन व्हायरल झाली आहे. या पोस्टला 166 शेअर, 322 लाईक्स आणि 08 कमेंटस् मिळाले आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

ही पोस्ट फेसबुकवर इतरही विविध पेज आणि अकाउंटवर व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील फोटो बद्दल सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने व्हायरल होणारा फोटो गुगलवर रिव्हर्स इमेज केला.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा सार्वजनिक शौचालयाचा फोटो हा बिहारमधील नसून आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहे. यासंदर्भात विविध माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे.

Urban Design Collective l अर्काईव्ह

Imgur.com l अर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये दाखविण्यात आलेले सार्वजनिक शौचालये ही आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहेत. त्याचप्रमाणे आंध्रप्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत किती शौचालये बांधण्यात आली आहेत त्यासंबंधीची आकडेवारी खाली दिली आहे.

आंध्रप्रदेश

आंध्रप्रदेश सरकारी अधिकृत स्वच्छ भारत मिशन वेबसाईटअर्काईव्ह

बिहारमध्ये स्वच्छ भारत अभियान 8,50,000 पेक्षा जास्त शौचालये बांधण्यात आले आहेत हे तथ्य खरे आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील शौचालयांची आकडेवारी जाहीर केली आहे. युट्युबवर एएनआय न्युज या चॅनलवर 10 एप्रिल 2018 रोजी व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओत 45 सेकंदापासून ते 1:10 सेकंदापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील शौचालयांची आकडेवारी सांगितली आहे.

अर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट – फोटो आणि त्या फोटोसंदर्भात लिहिण्यात आलेले मोदी सरकारद्वारा बिहारमध्ये बांधण्यात आलेली विश्वविक्रमी 8,50,000 शौचालये यामध्ये दाखविण्यात आलेला फोटो हा बिहार मधील नसून आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहे. परंतू बिहारमध्ये मोदी सरकारद्वारा 8,50,000 शौचालये बांधण्यात आले आहेत हे तथ्य सत्य आहे. परंतू सोशल मीडियावर दाखविण्यात येणारा सार्वजनिक शौचालयांचा फोटो हा बिहारमधील नसून, आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील सार्वजनिक शौचालयांचा फोटो खोटा आहे.

निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट मोदी सरकारद्वारा बिहारमध्ये बांधण्यात आलेले विश्वविक्रमी शौचालये यामधील फोटो खोटा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये दाखविण्यात येणारा सार्वजनिक शौचालयांच फोटो हा बिहारमधील नसून आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील आहे. त्यामुळे पोस्टमधील फोटो खोटा आहे.

Avatar

Title:फोटोमध्ये दाखविण्यात आलेली शौचालये बिहारमधील आहेत का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False