‘भारत जोडो यात्रे’ची लोकप्रिया पाहून नरेंद्र मोदी मझारवर चादर अर्पण करायला गेले होते का? वाचा सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ एका मझारवर चादर अर्पण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यासोबत दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला मिळणाऱ्या लोकप्रियतेला पाहून मोदींनी मशिदींमध्ये जाणे सुरू केले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन (9049053770) क्रमांकावर पाठवून याची सत्यता विचारली.

आमच्या पडताळणीत हा दावा भ्रामक असल्याचे आढळले. 

काय आहे दावा ? 

पीएम मोदी आणि सीएम आदित्यनाथ यांचा हा व्हिडिओ शेअर करून म्हटले जात आहे की, “भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे मोदी आणि योगी यांनी मस्जिदींमध्ये जाऊन चादर चढविली.”

मुळ पोस्ट — फेसबुक

तथ्य पडताळणी 

सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याचा शोध घेतला. कीवर्ड सर्चद्वारे कळाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 साली संत कबीर यांच्या समाधीला दिलेल्या भेटीचा हा व्हिडिओ आहे. 

ANI वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत आणि कवी कबीर यांच्या 500 व्या पुण्यतिथीनिमित्त 28 जुन 2018 रोजी उत्तर प्रदेशामधील मगहूरला भेट दिली होती. तेथे कबीर यांच्या मझारवर त्यांनी चादर अर्पण केली होती. 

यावेळी पंतप्रधानांनी संत कबीर गुहेला भेट दिली आणि संत कबीर अकादमीच्या भूमीपूजनानिमित्त एका कोनशिलेचे अनावरणसुद्धा केले होते. 

पंतप्रधान कार्यालयानेसुद्धा या कार्यक्रमाबद्दल ट्विट करून या माहिती दिली होती. 

निष्कर्ष 

या वरून स्पष्ट होते की, पंतप्रधान मोदी यांचा संत कबीर यांच्या मझारवर चादर अर्पण करतानाचा व्हिडिओ 4 वर्षे जुना आहे. या व्हिडिओचा आणि गेल्या महिन्यात सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा काही संबंध नाही. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:‘भारत जोडो यात्रे’ची लोकप्रिया पाहून नरेंद्र मोदी मझारवर चादर अर्पण करायला गेले होते का? वाचा सत्य

Fact Check By: Factcrescendo Team 

Result: Misleading