निर्भया हेल्पलाईन (983331222) बंद झालेली आहे. महिलांनी सुरक्षेसाठी 1091 क्रमांकावर संपर्क साधावा

False सामाजिक

हैदराबाद सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमिवर महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी निर्भया हेल्पलाईन 983331222 सुरू केल्याचे मेसेज सध्या फिरत आहे. आपत्कालिन परिस्थितीत महिलांनी या क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे मेसेजमध्ये?

983331222 हा निर्भया क्रमांक आपल्या पत्नी, मुली, बहिणी, माता, मित्रांना आणि आपणास माहित असलेल्या सर्व महिलांना पाठवा. हा नंबर सेव्ह करा. आपत्कालीन परिस्थितीत महिला या क्रमांकावर मेसेज किंवा मिस कॉल देऊ शकता. त्यांनर तुमचे लोकेशन शोधून आपल्या मदतीसाठी येतील, असे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी  

983331222 या क्रमांकावर फोन केला असता तो अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आले. ट्रूकॉलरवर हा नंबर मुंबई येथील असल्याचे कळाले. याबाबत शोध घेतला असता हा क्रमांक मुंबई रेल्वे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सुरु केला होता, असे दिसून आले. 

मुंबई मिरर संकेतस्थळावरील माहितीनुसार मुंबई रेल्वे पोलिसांनी रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी 983331222 हा निर्भया मदत क्रमांक 2015 मध्ये सुरू केला होता. 

image5.png

Archive

मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी मंजुनाथ सिंगे यांनी फॅक्ट क्रेसेंडोशी बोलताना सांगितले की, 983331222 हा क्रमांक आता अस्तिवात नाही. आपात्कालिन परिस्थिती नागरिकांनी 100 क्रमांकावर संपर्क करावा. हा क्रमांक थेट स्थानिक नियंत्रण कक्षात जातो. महिलांसाठी 1091 हा क्रमांक उपलब्ध आहे.

मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावरसुद्धा निर्भया हेल्पलाईन क्रमांक 983331222  एक फेब्रुवारी 2018 पासून बंद करण्यात आल्याचे दिले आहे. 

image3.png

Archive

निष्कर्ष 

महिला सुरक्षेसाठी मुंबई रेल्वे पोलिसांनी 983331222 हा क्रमांक 2015 मध्ये सुरु केला होता. हा क्रमांक 2018 मध्ये बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे. नागरिकांनी आपातकालीन परिस्थितीत 100 क्रमांकावर तर महिलांनी 1091 क्रमांकावर संपर्क साधावा.

Avatar

Title:निर्भया हेल्पलाईन (983331222) बंद झालेली आहे. महिलांनी सुरक्षेसाठी 1091 क्रमांकावर संपर्क साधावा

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False