Fact Check : ठाण्यात बजरंग दलाने शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले?

False राजकीय | Political

मिरा रोड येथील एका शाळेत बजरंग दलाकडून विद्यार्थ्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

मुंबईत मिरा रोड येथील एका शाळेत बजरंग दलाकडून विद्यार्थ्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले का? याची पडताळणी करत असताना आम्हाला याबाबत विविध वर्तमानपत्रांनी दिलेले वृत्त दिसून आले. या सगळ्या वृत्तात याबाबत डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेने तक्रार दिली असल्याचे म्हटले आहे.

archived linkthe hindu
archived linktimes of india
archived linkabp majha

काही माध्यमांनी या घटनेबाबतचे वृत्त देताना पोलीस अधिकाऱ्यांनी असे कोणतेही प्रकारचे शस्त्र प्रशिक्षण देण्यात आल्याचे नाकारले आहे, असे म्हटले आहे.

इंडिया टूडेने 2 जून 2019 रोजी दिलेल्या वृत्तात ठाणे जिल्ह्याचे पोलीस उपअधिक्षक अतुल कुलकर्णी यांची प्रतिक्रिया दिली आहे. ती प्रतिक्रिया खालील प्रमाणे आहे.

“ कोणतीही बेकायदेशीर बाब आढळून आल्यास आम्ही त्याबाबत गुन्हा दाखल करु, प्राथमिक तपासात असा कोणताही प्रकार आढळून आलेला नाही. त्याठिकाणी कोणतीही तलवार आणि रायफल नव्हती. आम्ही प्रशिक्षण देण्याचा दावा करण्यात आलेल्या जागेला भेट दिली आहे. या घटनेबाबत वापरण्यात आलेली छायाचित्रे अन्य ठिकाणची आहेत. या ठिकाणी एअरगनचा कसा वापर करावा हे सांगण्यात आले आहे पण एअरगन वापरणे बेकायदेशीर नाही. आम्ही त्यांना मिळालेल्या परवानग्या आणि अन्य बाबींचा तपास करत आहोत .”

आम्ही या घटनेबाबत वृत्त देताना वापरण्यात आलेले छायाचित्र शोधले असता ते मुंबईतील नसल्याचे आणि तीन वर्षापुर्वी मे 2016 मध्ये अयोध्येत बजरंग दलाने घेतलेल्या दहशतवादीविरोधी प्रशिक्षणाचे असल्याचे आढळून आले.  

निष्कर्ष

मुंबईत मिरा रोड येथील एका शाळेत बजरंग दलाकडून विद्यार्थ्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आल्याची बाब पोलिसांच्या तपासात असत्य असल्याचे दिसून आले आहे. यासाठी दाखविण्यात येत असलेली छायाचित्रे ही मुंबईतील नसून अयोध्या येथील जुनी छायाचित्रे आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : ठाण्यात बजरंग दलाने शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले?

Fact Check By: Dattateay Gholap 

Result: False