
नेपाळ सरकारने तेथील शंभर आणि एक हजार रुपयांच्या नोटेवर गौतम बुद्धांचे छायाचित्र प्रकाशित केले, असा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहेत.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, नेपाळ सरकारने गौतम बुद्धांचा सन्मान करीत नोटांवर बुद्धांचे छायाचित्र छापले.

मूळ पोस्ट — फेसबुक
तथ्य पडताळणी
कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, नेपाळ सरकारने गौतम बुद्धांचे छायाचित्र नोटांवर जारी केले नाही.
नेपाळच्या राष्ट्रीय बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर तेथील चलनातील नोटांचा नमुना उपलब्ध आहे.
खालील नोटेमध्ये तत्कालिन नेपाळचे राजे महेंद्र यांचे छायाचित्र आहे.

नेपाळ राष्ट्रीय बँकेच्या अधिकृत नोटांची आणि व्हायरल फोटोची तुलना केल्यावर फरक लगेच लक्षात येतो. व्हायरल नोटा बनावट आहेत. मूळ शंभर नेपाळी रुपयाच्या नोटेवार डोंगराचे छायाचित्र पाहु शकतो.

दोन्ही फोटोंची तुलना केल्यावर स्पष्ट होते की, व्हायरल फोटो बनावट आहे.

निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो बनावट असून नेपाळ सरकारने शंभर आणि हजारच्या नोटेवर गौतम बुद्धाचे छायाचित्र जारी केलेले नाही.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:नेपाळने गौतम बुद्धांचे छायाचित्र असलेल्या नोटा जारी केलेल्या नाहीत; बनावट फोटो व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Altered
