Fact Check : तुलसी गबार्ड या भारतीय वंशाच्या आहेत का?

False आंतरराष्ट्रीय राजकारण | Politics

अमेरिकेच्या डेमोक्रेटीक पक्षाच्या संभाव्य उमेदवार तुलसी गबार्ड या भारतीय वंशाच्या असल्याची माहिती Hrishikesh Akatnal यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी 

तुलसी गबार्ड या नेमक्या कोण आहेत आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विकीपीडियावर असलेल्या माहितीत त्या भारतीय वंशाचा असल्याचा कोणताही उल्लेख आम्हाला आढळून आला नाही.

Archive

त्यानंतर आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला त्यावेळी आम्हाला आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने 21 सप्टेंबर 2019 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात भारतीय मूळ असलेल्या समुदायात तुलसी गबार्ड लोकप्रिय असल्या तरी त्या भारतीय नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. हे आपण खाली पाहू शकता. 

Archive

तुलसी गबार्ड यांनी त्या भारतीय वंशाच्या असल्याचा गैरसमज पसरत असल्याने 17 ऑक्टोबर 2012 रोजी ट्विट केले होते. हे ट्विट आपण खाली पाहू शकता.

Archive

भारतीय वंशाबाबत वारंवार विचारणा होत असल्याने तुलसी गबार्ड यांनी 27 डिसेंबर 2014 रोजी पुन्हा ट्विट केले होते. ते आपण खाली पाहू शकता.

Archive

नवभारत टाईम्स या हिंदी दैनिकाच्या संकेतस्थळाने 13 जानेवारी 2019 रोजी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, तुलसी गबार्ड या हिंदू आहेत मात्र भारतीय नाहीत.

Archive

बीबीसी मराठीनेही 13 जानेवारी 2019 रोजी तुलसी गबार्ड यांच्याविषयी वृत्त देताना तुलसी यांचा भारताशी फारसा संबंध नाही. त्यांचे आईवडील भारतीय वंशाचे नाहीत, असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. ते आपण खाली पाहू शकता.

बीबीसी मराठी / Archive

निष्कर्ष 

तुलसी गबार्ड यांनी स्वत: त्या भारतीय वंशाच्या नसल्याचे स्पष्टीकरण वेळोवेळी दिले आहे. विविध माध्यमांनीही याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या पोस्टमधील ही बाब असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : तुलसी गबार्ड या भारतीय वंशाच्या आहेत का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False