
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीने वेगळे होण्याची आणि सामाजिक अंतर राखण्याची काही गरज नाही. हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्याला संक्रमित होऊ शकत नाही, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची तथ्य पडताळणी केली आहे.
काय आहे दावा?
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे.
तथ्य पडताळणी
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या आपल्या भूमिकेपासून घुमजाव केल्याचा हा व्हिडिओ आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी हा व्हिडिओ युटयूबवर उपलब्ध असल्याचे दिसून आला. बर्लिन येथे वर्ल्ड डॉक्टर एलायन्स या संघटनेच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ असल्याचे याठिकाणी दिसून येते.
हा व्हिडिओ bitchute (Archive) या संकेतस्थळावरही दिसून आला. जागतिक आरोग्य संघटनेशी या संस्थेचा कोणताही संबंध असल्याचे मात्र दिसून आले नाही.
जागतिक आरोग्य संघटनेचा हा व्हिडिओ नसल्याचे स्पष्ट झाल्यावर या व्हिडिओतील दावे किती खरे आहेत हे आपण पाहू.
दावा क्र. 1- कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला अलगीकरण, विलगीकरणात ठेवण्याची गरज नसल्याचे यात म्हटले आहे. सेंटर ऑफ डिसिस कंट्रोल अँन्ड प्रिव्हेशनने मात्र कोविड-19 विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीने अलगीकरण, विलगीकरणात ठेवण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.
दावा क्र. 2- कोरोना विषाणूचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळास भेट दिल्यावर विविध कारणांनी कोरोना विषाणूचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होऊ शकते, असे म्हटले असल्याचे दिसून येते.
दावा क्र. 3- कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींचा चुकीचा अहवाल येण्याचे प्रमाण जास्त असल्याचा दावा करण्यात येत आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नल लॅन्सेटने चुकीचा अहवाल येण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे म्हटले आहे.
निष्कर्ष
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांपासून घुमजाव करणारा कोणताही व्हिडिओ जारी केलेला नाही. हा व्हिडिओ वर्ल्ड डॉक्टर एलायन्सचा असून असत्य माहिती देत आहे.

Title:जागतिक आरोग्य संघटनेने घुमजाव केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
