‘डॉक्टर आयेशा’ यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त फसवे; वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

कोरोना व्हायरसची वाढती संख्या आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची प्रकरणं दररोज आपण ऐकत आहोत. मात्र हा फोटो पाहा. हा शेवटचा फोटो आहे डॉक्टर आयशाचा. अत्यंत अॅक्टिव्ह अशी आयशा आताच डॉक्टर झाली होती. त्यामुळे अर्थातच ती खूप खुश होती. मात्र त्यातच तिला कोरोनाची लागण झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र ती कोरोनाला हरवू शकली नाही. आणि ईदच्या दिवशी तिने शेवटचा श्वास घेतला. जगाचा निरोप घेताना ती लोकांसाठी एक संदेश आणि हास्य सोडून गेली, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र पसरत आहे. खरोखरच अशा कोणी डॉक्टर आयेशा याचा कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.08.03-15_30_27.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

screenshot-archive.is-2020.08.03-16_10_12.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

कोरोनाचा विषाणूची लागण झाल्याने झुंज देताना डॉक्टर आयेशा यांचा खरोखरच मृत्यू झाला का? याची माहिती घेण्यासाठी शोध घेतला. त्यावेळी अशा स्वरूपाचे वृत्त अनेक संकेतस्थळांनी दिले असल्याचे दिसून आले. त्यानंतर द फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळावरील एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार डॉ. आयेशा यांच्या मृत्यूबाबतेच वृत्त हे फसवे होते. ज्या ट्विटर खात्यावरून याबाबतचे ट्विट करण्यात आले होते. ते ट्विट खातेच आता हटविण्यात आले आहे. या ट्विटर खात्याच्या आधारेच एका संकेतस्थळाने वृत्त दिले होते. त्यानंतर तोच धागा पकडत अनेक रिट्विट केले आणि डॉक्टर आयेशा यांना श्रध्दांजली देखील अपर्ण केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. हे सविस्तर वृत्त आपण खाली वाचू शकता.

screenshot-www.freepressjournal.in-2020.08.03-16_45_53.png

फ्री प्रेस जर्नलने दिलेले वृत्त / संग्रहित

त्यानंतर डॉक्टर आयेशा यांच्या ट्विटर खात्यास भेट दिली. त्यावेळी याठिकाणी हे खाते आता अस्तित्वात नसल्याचे दर्शविण्यात आल्याचे दिसून आले. खासगी क्षेत्रातील परिचारिकांसाठी कार्यरत असलेल्या युनायटेड नर्सेस असोसिएशन या संघटनेने याबाबत आपल्या फेसबुक पेजवर माहिती देताना डॉक्टर आयेशा यांच्याबाबतचे वृत्त फसवे आणि असत्य असल्याचे म्हटले आहे. 

screenshot-www.facebook.com-2020.08.03-17_31_33.png

फेसबुक पेज / संग्रहित

यातून हे स्पष्ट झाले की, ज्या ट्विटर खात्याच्या आधारावर माध्यमांनी डॉक्टर आयेशा यांच्या मृत्यूचे वृत्त दिले होते. ते ट्विटर खातेच आता अस्तित्वात नाही. त्यानंतर व्हायरल होत असलेला छायाचित्रात दिसणाऱ्या उशीवर लाईफ असे इंग्रजीत लिहिले असल्याचे दिसून आले. हे नेमके काय आहे, याचा शोध घेतल्यावर तेलंगण राज्यातील कामारेड्डी या ठिकाणी लाईफ हे रुग्णालय असल्याचे दिसून आले. या रुग्णालयाचा आणि उशीवर असलेला लोगो एकच असल्याचे दिसून आले. खाली आपण या दोन्हीची तुलना पाहू शकता.

image6.png

लाईफ रुग्णालयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लाईफ रुग्णालय हे कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय नाही. येथे कोविड-19 ची लागण झालेला एकही रुग्ण नाही. त्यामुळे डॉ. आयशा नावाच्या कोणत्याही रुग्णाचा कोविड-19 ची लागण झाल्याने मृत्यू झालेला नाही. रूग्णांच्या वैयक्तिक माहितीविषयी गोपनीयता बाळगण्याच्या धोरणामुळे रूग्णालय या रुग्णाविषयी कोणतीही माहिती देऊ शकत नाही. ही उशी रुग्णालयाचीच असून लाईफ रुग्णालयाची कोठेही शाखा नाही.

निष्कर्ष 

डॉक्टर आयेशा यांचा कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाल्याचे असत्य आहे.

Avatar

Title:‘डॉक्टर आयेशा’ यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त फसवे; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False