Fact : इंदुरीकर महाराजांचे राजकारण येणार नसल्याचे स्पष्टीकरण

False राजकीय | Political

इंदूरीकर महाराज पण राजकारणात यायला लागलेत… मग आता #वरुन_किर्तन_आतुन_तमाशा #जब्या_वाजीव  अशी माहिती Vaibhav Kamble‎ यांनी पोस्ट केली आहे. इंदूरीकर महाराज खरंच राजकारणात सक्रीय होत आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी   

इंदुरीकर महाराज निवडणुक लढविणार का याचा शोध घेतला असता सर्वप्रथम आम्हाला महाराष्ट्र टाईम्सचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तात प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत थेट व्यासपीठावर दिसले. त्यामुळं इंदुरीकर महाराज यंदा विधानसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच हे वृत्त चर्चेत असल्याचे या वृत्तात कुठेही इंदुरीकर महाराजांनी याला दुजोरा दिल्याचे दिसून येत नाही.

सविस्तर वृत्त : महाराष्ट्र टाईम्स 

दैनिक सकाळनेही आपल्या संकेतस्थळावर याबाबत वृत्त देताना इंदुरीकर यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणुक रिंगणात उतरविण्यात येणार असल्याचे बोलले जात असल्याचे म्हटले आहे. इंदुरीकरांनी याबाबत भुमिका जाहीर केली नसल्याचेही यात म्हटले आहे.

सविस्तर वृत्त : दैनिक सकाळ

इंदुरीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे राज्यात चर्चा सुरु झाल्यानंतर स्वत: इंदुरीकर महाराज यांनी आता याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हे स्पष्टीकरण आपण खाली सविस्तर वाचु शकता. केवळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाखाचा धनादेश देण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेत भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. त्याचा राजकीय अर्थ काढू नये. मी समाजसेवेचा वसा हाती घेतला असून शेवटपर्यंत हा वसा पुढे नेणार आहे. मी राजकारणात प्रवेश करणार नसून कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. फॅक्ट क्रेसेंडोलाही त्यांचे हे स्पष्टीकरण प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्र टाईम्सनेही निवृत्ती महाराज इंदोरीकर हे निवडणुक लढविणार नसल्याचे वृत्त स्वतंत्रपणे प्रसिध्द केले आहे.

निष्कर्ष

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाखाचा धनादेश देण्यासाठी इंदुरीकर महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेत भेट घेतली. राजकारणात प्रवेश करणार नसून कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact : इंदुरीकर महाराजांचे राजकारण येणार नसल्याचे स्पष्टीकरण

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False