Fact Check : घर बदलल्यावर मतदान कार्डावरचा पत्ता बदलण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे का?
(सांकेतिक छायाचित्र : representative image)
मतदान ओळखपत्रात दुरुस्ती करायची आहे ना..संकेतस्थळावर भेट द्या! घर बदलल्यावर Myvotemypledge.com येथून मतदानकार्डावरचा पत्ता बदलणे. शास्त्र असतं ते अशी माहिती Devendra Fadnavis for Maharashtra या पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने मतदानकार्डावरचा पत्ता बदलण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
घर बदलल्यावर मतदान कार्डावरचा पत्ता बदलण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ कोणते हे जाणून घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ असा शोध घेतला तेव्हा आम्हाला राज्य निवडणूक आयोगाचे https://mahasec.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ आम्हाला दिसून आले. त्यानंतर आम्ही हेच अधिकृत संकेतस्थळ आहे का, याचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे, भारत सरकारचे आणि केंद्रीय निवडणुक आयोगाचे संकेतस्थळही पाहिले. यातून एक बाब स्पष्ट झाली की, बहुसंख्य सरकारी संकेतस्थळांवर gov.in असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे.
आम्ही आणखी शोध घेतला असता हे दिसून आले की सरकारी संकेतस्थळांनी डॉट कॉम असा शब्दप्रयोग केल्याचे कुठेही दिसून येत नाही. त्यानंतर आम्ही डॉट कॉम म्हणजे नेमके काय हे सुध्दा जाणून घेतले. त्यावेळी आंतरजाल म्हणजेच इंटरनेटवर व्यवसाय करणारी कंपनी असा त्याचा अर्थ आम्हाला दिसून आला.
यातून हे स्पष्ट झाले की, डॉट कॉम असलेले हे संकेतस्थळ निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ नाही. त्यानंतर आम्ही आमचा शोध पुढे नेत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट दिली. या संकेतस्थळावरील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधल्यावर https://www.nvsp.in/ या संकेतस्थळावरुन आपण आपल्या पत्त्यात बदल करु शकता अशी माहिती देण्यात आली. राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनीही nvsp.in हे निवडणुक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान हे संकेतस्थळ नेमके कुठून चालविण्यात येते याचा शोधही घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यावेळी हे संकेतस्थळ टोरंटो येथून चालविण्यात येत असल्याचे आम्हाला who.is या संकेतस्थळावरुन शोध घेतला असता लक्षात आले.
निष्कर्ष
घर बदलल्यावर निवडणुक कार्डावरील पत्ता बदलण्यासाठी निवडणुक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ nvsp.in असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत पोस्टमधील माहिती असत्य असल्याचे स्पष्ट होत आहे.
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:Fact Check : घर बदलल्यावर मतदान कार्डावरचा पत्ता बदलण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे का?
Fact Check By: Ajinkya Khadse
Result: False