म्यानमारमधील भाजी बाजाराची छायाचित्रे मिझोराममधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Coronavirus False आंतरराष्ट्रीय | International सामाजिक

जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सामाजिक अंतर राखणे हा त्यापैकीच एक उपाय आहे. सरकारकडूनही याबाबत सातत्याने जागृती करण्यात येत आहे. याचेच एक उदाहरण म्हणून मिझोराममधील भाजी बाजारातील म्हणून समाजमाध्यमात काही फोटो व्हायरल होत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने ही छायाचित्रे खरोखरच मिझोराममधील आहेत का? याची तथ्य पडताळणी केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

हे छायाचित्र नेमके कुठले आहे हे जाणून घेण्यासाठी ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी अनेक संकेतस्थळांनी हे छायाचित्र म्यानमारमधील असल्याचे वृत्त दिल्याचे दिसून आले. त्यानंतर म्यानमारचे अर्थविषयक परराष्ट्रमंत्री Thaung Tun यांचे 19 एप्रिल 2020 रोजीचे एक ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये त्यांनी कलावमधील प्रशासनाचे आणि नागरिकांचे सामाजिक अंतर राखत असल्याबद्दल आभार मानले आहेत. 

ARCHIVE

त्यानंतर आम्ही कलाव शहराचा शोध घेतला. त्यावेळी हे शहर म्यानमारमधील शान या राज्यात असल्याचे दिसून आले. कलाव हे शहर आपल्या निसर्गसौदर्य आणि शिस्तप्रिय जीवनासाठी प्रसिध्द असल्याचेही दिसून आले. त्यानंतर फॅक्ट क्रेसेंडोतील म्यानमारमधील प्रतिनिधीशी आम्ही संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी हे छायाचित्र म्यानमारमधीलच असल्याचे स्पष्ट केले. या छायाचित्रातील दुकानांवर दिसणारे फलकही बर्मी या स्थानिक भाषेत लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले. 

याशिवाय नेशन थायलंड, फिलन्यूज, द वर्ल्ड न्यूज या संकेतस्थळांनी ही छायाचित्रे म्यानमारमधील असल्याचे वृत्त दिलेले आहे. यावरून हे स्पष्ट झाले की, ही छायाचित्रे मिझोराममधील नसून म्यानमारमधील आहेत.

निष्कर्ष

सामाजिक अंतर राखण्याविषयीची मिझोरामच्या भाजी बाजारातील म्हणून समाजमाध्यमात व्हायरल होत असलेली छायाचित्रे ही म्यानमारमधील आहेत.

Avatar

Title:म्यानमारमधील भाजी बाजाराची छायाचित्रे मिझोराममधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False