अयोध्येत सापडलेल्या शिवलिंगाचे हे छायाचित्र आहे का? वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

अयोध्येत सपाटीकरण करताना काही दिवसांपूर्वी काही अवशेष सापडले. त्यानंतर अयोध्येत सापडलेल्या शिवलिंगाचे म्हणून समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र अयोध्येत सापडलेल्या शिवलिंगाचे आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Ayodhya Shivling.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

अयोध्येत खरोखरच शिवलिंग सापडले का? याचा शोध घेतला. त्यावेळी बीबीसी मराठीने 24 मे 2020 रोजी प्रसिध्द केलेले वृत्त दिसून आले. या वृत्तात अयोध्येत सपाटीकरण करताना काही अवशेष सापडल्याचे म्हटले आहे. या अवशेषांबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याचेही या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. या वृत्तात याठिकाणी सापडलेल्या अवशेषांची छायाचित्रेही देण्यात आली आहेत. परंतू यातील एकही छायाचित्र व्हायरल होत असलेल्या छायाचित्रासोबत जुळत नव्हते.

ayodhya news.png

बीबीसी मराठी / संग्रहित

अयोध्येत सापडलेल्या शिवलिंगाचे छायाचित्र नेमके कुठले? असा प्रश्न त्यामुळे पडला. त्यानंतर हे छायाचित्र रिव्हर्स सर्च केले असता अमर उजाला या हिंदी दैनिकाच्या संकेतस्थळाने 27 जुलै 2016 रोजी प्रसिध्द केलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार फर्रुखाबाद येथील मठिया देवी मंदिरात खोदकाम करत असताना अडीचशे वर्ष जुन्या शिवलिंगाचा तेवढाच हिस्सा आतून बाहेर आला. 

Amar ujala.png

अमर उजाला / संग्रहित

यातून हे स्पष्ट झाले की, हे अयोध्येतील सापडलेले शिवलिंग नाही. फर्रुखाबाद येथील मठिया देवी मंदिरात खोदकाम करत असताना बाहेर आलेल्या शिवलिंगाचा हा भाग आहे.

निष्कर्ष

अयोध्येत सापडलेल्या शिवलिंगाचे हे छायाचित्र असल्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:अयोध्येत सापडलेल्या शिवलिंगाचे हे छायाचित्र आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •