लाटा उसळण्याचा हा व्हिडियो वरळी सी-लिंक पुलावरील नाही. तो 3 वर्षे जूना आहे.

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

निसर्ग वादळाने मुंबईला हुलकावणी जरी दिली असली तरी सोशल मीडियावर त्याचा प्रभाव दिसून येत आहे. खवळलेल्या समुद्राच्या उंच लाटा एका पुलाला गिळंकृत करतानाचा व्हिडियो सध्या फिरत आहे. हा व्हिडियो निसर्ग वादळादरम्यान मुंबईतील वरळी सी-लिंक पुलाचा असल्याचा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली असता हा व्हिडियो 2017 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे समोर आले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

“वरळी सी लिंक ब्रीजचा कालच्या चक्रीवादळ काळातील व्हिडीओ” अशा कॅप्शनसह पुढील व्हिडियो व्हायरल होत आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हिडियोचे बारकाईने निरीक्षण केल्यावर दिसते की, विशाल लाटा उसळत असताना पुलावर एक व्यक्ती मोटारसायकलवर आणि दुसरा व्यक्ती पायी चालताना दिसतो. वरळी सी-लिंकवर यो दोन्ही गोष्टींची परवानगी नाही. तसेच या पुलाची रचनादेकील मुंबईतील सी-लिंकसारखी नाही. त्यामुळे हा व्हिडियो मुंबईतील असण्याबद्दल शंका येते.

हा व्हिडियो नेमका कधीचा आणि कुठला आहे हे तपासण्यासाठी युट्युबवर की-वर्ड्सद्वारे सर्च केले. त्यातून कळाले हा व्हिडियो डिसेंबर 2017 मध्येसुद्धा वरळी सी-लिंकच्या नावाखाली व्हायरल झाला होता. ओखी चक्रीवादळामुळे अशा लाटा उसळल्याचे तेव्हा म्हटले गेले होते. तसेच हाच व्हिडियो रामेश्वरम, विशाखापट्टणम आणि श्रीलंका येथील म्हणूनही शेयर झालेला आहे. परंतु, हे सगळे व्हिडियो 3 डिसेंबर 2017 या तारखेच्या नंतरचे आहेत. 

अधिक शोध घेतला असता, सर्वात आधी हा व्हिडियो 24 ऑगस्ट 2017 रोजी युट्यूबवर अपलोड केल्याचे आढळले. 

यातील माहितीनुसार, हा व्हिडियो लक्षद्विप बेटावरील आहे. तेथील मिनिकॉयच्या पूर्व दिशेकडील समुद्र-पुलावर 23 ऑगस्ट 2017 रोजी अशा विराट लाटा धडकल्या होत्या. यामध्ये कोणतीही जीवित हाना झाली नव्हती. 

लक्षद्विप बेटावर असा काही पूल आहे का याचा शोध घेतला असता श्रीशैला कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वेबसाईटवरील खालील फोटो मिळाला. यानुसार, कंपनीने लक्षद्विप येथील पूर्व मिनिकॉय बेटावर हा समुद्र-पूर बांधलेला आहे.

Jettys.jpg

मूळ फोटो येथे पाहा – श्रीशैला कन्स्ट्रक्शन

वरील फोटोतील पूलाचे कठडे आणि रचना व्हडियोतील पुलाशी मिळतीजुळती आहे.

निष्कर्ष

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईतील सी-लिंक पुलावर विशाल लाटा उसळल्याचा हा व्हिडियो नाही. हा व्हिडियो ऑगस्ट 2017 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. प्रथमदर्शनी हा व्हिडियो लक्षद्विप येथील असल्याचे प्रतीत होते परंतु, ठोसपणे स्थान सांगता येत नाही. तरी हा व्हिडियो किमान 3 वर्षे जुना आणि मुंबईतील नसल्याचे स्पष्ट आहे.

Avatar

Title:लाटा उसळण्याचा हा व्हिडियो वरळी सी-लिंक पुलावरील नाही. तो 3 वर्षे जूना आहे.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •