चीनमधील ‘ड्रॅगन परेड’चा व्हिडिओ केरळमधील नौका दीपोत्सवाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

दिव्यांनी उजाळलेल्या नौकांचा एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, केरळमध्ये नुकतेच 240 होड्यांवर अशी रोषणाई करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ केरळमधील नाही. 

काय आहे दावा?

दिव्यांच्या रोषणाईने नटलेल्या होड्यांचा हा व्हिडिओ शेअर करून म्हटले जात आहे की, “केरळमध्ये एकाच वेळेस 240 नौकांमधून साजरा केलेला हा दीपोत्सव”

मूळ पोस्ट – ट्विटरफेसबुकफेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हिडिओतील कीफ्रेम्सला रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हा व्हिडिओ गेल्या अनेक महिन्यांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

चीनमधील पीपल्स डेली युट्युब चॅनेलवर 13 मे रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. 

या सोबतच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ चीनमधील युलोंग नदीवरील आहे. तेथे आयोजित ‘गोल्डन ड्रॅगन परेड’मध्ये होड्यांवर रोषणाई करून डॅगनचा आकाराने नदीमध्ये परेड केली जाते. 

चीनमधील वृत्तसेवा वेबसाईटवरील बातमीनुसार, चीनच्या यांगशुओ प्रांतामध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. बांबूपासून तयार करण्यात आलेल्या 88 तरफ जोडून ड्रॅगनचा आकार देण्यात आला होता. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, चीनमधील गोल्डन ड्रॅगन परेडचा व्हिडिओ केरळमधील दीपोत्सवाचा म्हणून शेअर करण्यात येत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:चीनमधील ‘ड्रॅगन परेड’चा व्हिडिओ केरळमधील नौका दीपोत्सवाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False