तथ्य पडताळणी : रिझर्व्ह बॅंकेने म्हटले का, नोटबंदी अयोग्य निर्णय, 9 लाख कोटीचा घोटाळा

False अर्थव्यवस्था
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

नोटबंदी हा एक चुकीचा निर्णय होता आणि यात 9 लाख कोटींचा घोटाळा झाला होता, असे मत रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गर्व्हनर उर्जित पटेल यांनी व्यक्त केले आहे, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

उर्जित पटेल हे रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर असताना त्यांनी नोटबंदीवर खरंच टीका केली होती का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला businesstoday.in या संकेतस्थळाचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार पटेल यांनी सरकारवर थेट टीका करण्याचे टाळले आहे.

अक्राईव्ह लिंक

रिझर्व्ह बॅंकेचे माजी गर्व्हनर उर्जित पटेल यांनी नोट बंदी हा 9 लाख कोटीचा घोटाळा होता, असे ट्विट केल्याचे म्हटले जात होते. याबाबत इंडिया टूडेने फॅक्ट चेक केले असून असे कोणतेही ट्विट केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अक्राईव्ह लिंक

नोटबंदीबाबत businesstoday.in ने एक वृत्त प्रसिध्द केले आहे. या वृत्तात रिझर्व्ह बँकेने सरकारला नोटबंदीचा पर्यटन आणि फार्मा सेक्टरला बसला असल्याचे सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेने नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता आणि त्यात 9 लाख कोटीचा घोटाळा होता, असे म्हटल्याचे कुठेही दिसत नाही.

अक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

रिझर्व्ह बँकेने नोटबंदीमुळे झालेल्या परिणामाबाबत वेळोवेळी सरकारला सांगितल्याचे स्पष्ट होत आहे. रिझर्व्ह बँकेने नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता आणि त्यात 9 लाख कोटीचा घोटाळा होता, असे म्हटल्याचे मात्र कुठेही दिसत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेडोंच्या तथ्य पडताळणीत हे वृत्त असत्य आढळले आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : रिझर्व्ह बॅंकेने म्हटले का, नोटबंदी अयोग्य निर्णय, 9 लाख कोटीचा घोटाळा

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •