नेपाळच्या संसदमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली का? वाचा सत्य
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसतो. दावा केला जात आहे की, या व्हिडिओ नेपाळच्या संसद भवनातील आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ नेपाळच्या संसदेचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारा हा व्यक्ती काँग्रेसचा खासदार आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भाजपने केलेल्या खर्च आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर झालेल्या खर्च यावरून टीका करताना दिसतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “नेपाळच्या संसदेत नेपाळचे खासदार मोदींबद्दल जे काही बोलले, ते प्रत्येक भारतीयाने उद्या किंवा मतदान केंद्रावर गेल्यावर हा व्हिडीओ पाहिलाच पाहिजे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळल्यावर व्हायरल व्हिडिओ नेपाळच्या संसदेचा नाही.
लाइव्ह टाइम्स टीव्ही हिमाचल या युट्यूब चॅनलने 17 मार्च 2021 हा व्हिडिओ अपलोड केला होता.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “जगत सिंग नेगी यांनी सभागृहात भाजपवर सडकून टीका केली.”
या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी खर्च झालेला पैसा, नोटाबंदी आणि पेट्रोलच्या दरवाढीवर टीका केली गेली आहे.
जगत सिंग नेगी यांच्या टीकेचा व्हिडिओ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - हिमाचल प्रदेश फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला होता.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “किन्नौरचे काँग्रेस आमदार जगत सिंह नेगी यांच्याकडून देशाच्या महान आणि यशस्वी पंतप्रधानांबद्दल ऐका.”
जगत सिंग नेगी
हिमाचल प्रदेश मंत्री परिषद यादीमध्ये जगत सिंग नेगी यांची महसूल मंत्री म्हणून नोंद आहे. तसेच बागायत आणि आदिवासी विकास विभागोचेदेखील काम बघतात.
मूळ पोस्ट – हिमाचल प्रदेश विधानसभा
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ नेपाळच्या संसदेतील नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारा हा व्यक्ती हिमाचल प्रदेशचे महसूल मंत्री जगत सिंग नेगी असून ते कँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:नेपाळच्या संसदमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली का? वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: Missing Context