अहमदनगरच्या मोदींच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी केली होती का? : सत्य पडताळणी

True राजकारण | Politics

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी करण्यास आली होती असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट

लोकमत न्यूज 18 या फेसबुक पेजवरुन व्हायरल झालेल्या या पोस्टला 681 शेअर, 2 हजार 300 लाईक्स, 423 कमेंटस् मिळाल्या आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर फेसबुकच्या इतर अकाउंट आणि पेजवरुनही ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट संदर्भात सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने गुगलवर मोदींची नगरमधील सभा काळे कपडे घालून जाण्यास मनाई असे सर्च केले.

लोकमत न्यूज 18अर्काईव्ह

डेलीहंटअर्काईव्ह

दैनिक प्रभातअर्काईव्ह

दैनिक पुढारीअर्काईव्ह

अहमदनगर येथे पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी काळ्या कपड्यांवर बंदी करण्यात आल्यासंदर्भात महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. युट्युबवर महाराष्ट्र टाईम्स या चॅनलवर 12 एप्रिल 2019 ला व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.

अर्काईव्ह

12 एप्रिल 2019 रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर सभेसंदर्भात अहमदनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाशी संपर्क केला.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत काळे कपडे घालून आलेल्या नागरिकांना अडविण्यात आल्याचे कारण म्हणजे देशातील महत्वाच्या व्यक्तींसाठी एक विशेष प्रोटोकॉल पाळण्यात येत असतो. या संदर्भात अहमदनगर प्रोटोकॉल विभागाचा नंबर देत त्यांनी अधिक माहिती त्या विभागाला माहिती आहे अशी प्रतिक्रिया फॅक्ट क्रिसेंडो टीमला दिली.

नितिन आगळे,

लिपीक, जिल्हा निवडणूक कार्यालय, अहमदनगर

  • सुरक्षेच्या कारणास्तव असे होवू शकते, परंतू राजशिष्टाचार आणि त्या संदर्भातील माहिती ही गोपनीय असल्याकारणाने याबद्दल स्पष्टपणे कोणतीही माहिती सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया फॅक्ट क्रिसेंडो टीमला देण्यात आली.  

स्वप्नील फलटणे,
सहाय्यक राजशिष्टाचार विभाग, अहमदनगर.  

सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींच्या अहमदनगर सभेमध्ये काळे कपडे घालून येण्यावर बंदी या आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. या संदर्भात फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी केल्यानंतर हे तथ्य सत्य आहे.

निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी हे तथ्य खरे आहे. अहमदनगर येथे झालेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 एप्रिल 2019 च्या प्रचारसभेत काळे कपडे घालण्यावर बंदी करण्यात आली होती.

Avatar

Title:अहमदनगरच्या मोदींच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी केली होती का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: True