अरविंद केजरीवाल यांना चापट मारल्यावर अण्णा हजारे यांची वादग्रस्त प्रतिक्रिया कितपत खरी आहे?

False राजकीय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नुकतेच एका तरुणाने श्रीमुखात लगावली. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिल्लीमध्ये एका तरुणाने जीपच्या बोनेटवर चढून केजरीवाल यांना चापट मारली. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ समाजसेवक यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरवला जात आहे. यामध्ये अण्णा हजारे केजरीवाल यांना एकच चापट मारली का असे विचारताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची सत्यता तपासली.

फेसबुकअर्काइव्ह

आठ सेंकदाच्या या व्हिडियोमध्ये सुरुवातीला जीपमधून रोड शो करीत असलेल्या केजरीवाल यांना एक तरुण चापट मारतो. त्यानंतर अण्णा हजारे पत्रकार परिषदेत उत्तर देताना म्हणतात की, थप्पड मारा…एकही मारा.

तथ्य पडताळणी

अरविंद केजरीवाल यांना 4 मे रोजी एका तरुणाने रोड शो दरम्यान चापट मारली होती. त्यानंतर अण्णा हजारे यांनी काय प्रतिक्रिया दिली याबाबत गुगलवर शोध घेतला असता पोस्टमध्ये दावा केल्याप्रमाणे कोणतीही बातमी किंवा व्हिडियो आढळला नाही. मग आम्ही व्हिडियोची सत्यता पडताळली.

व्हिडियोमध्ये अण्णा हजारे यांची पत्रकार परिषद इंडिया टीव्ही चॅनेलची आहे. गुगलवर Anna Hazare Slap Statement असे सर्च केल्यावर इंडिया टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवर खाली दिलेला व्हिडियो आढळला. हा व्हिडियो 24 नोव्हेंबर 2011 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. शरद पवार यांना एका तरुणाने त्यावेळी चापट मारली होती. या व्हिडियोमध्ये अण्णा हजारे त्या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणतात की, एकच चापट मारली का? यावरून त्याकाळी बराच वाददेखील झाला होता.

हरविंदर सिंग नावाच्या एका तरुणाने 24 नोव्हेंबर 2011 रोजी दिल्ली येथे शरद पवार यांना एका कार्यक्रमात चापट मारली होती. भ्रष्टाचार आणि वाढती महागाईमुळे त्याने असे कृत्य केल्याचे हरविंदर सिंग यांने सिंगतले होते. याविषयी अधिक येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाअर्काइव्ह

निष्कर्ष

याचाच अर्थ की, अण्णा हजारे यांनी ‘एकच चापट मारली’ अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांना चापट मारल्यानंतर नाही तर, आठ वर्षांपूर्वी शरद पवार यांना चापट मारल्यानंतर दिली होती. त्यामुळे हा व्हिडियो असत्य आहे.

Avatar

Title:अरविंद केजरीवाल यांना चापट मारल्यावर अण्णा हजारे यांची वादग्रस्त प्रतिक्रिया कितपत खरी आहे?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False