आमदार हाफिज खान यांनी नर्सला मौलानाचे पाय पकडून माफी मागायला लावली नाही; वाचा या व्हायरल फोटोमागील सत्य

Coronavirus False राजकीय

आंध्रपदेशमधील कुर्नूल येथील आमदार हाफिज खान यांनी एका नर्सला जबरदस्तीने मौलानाचे पाय धरायला लावले, अशा दाव्यासह एक फोटो व्हायरल होत आहे. सदरील नर्सने कोरोनासंदर्भात मर्कझमधील सहभागी मुस्लिमांविषयी टीका केली म्हणून हाफिज खान यांनी तिला दवाखान्यातील एका मुल्सिम रुग्णाचे पाय धरून माफी मागायला लावले, असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला.

काय आहे पोस्टमध्ये?

मुस्लिम व्यक्तीचे पाय पकडलेल्या नर्सचा फोटो शेयर करून म्हटले की, आंध्रप्रदेशीमधील कुर्नूल येथील मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिक आमदार हाफिज खान यांनी एका नर्सला मौलानाचे पाय पकडण्यास भाग पाडले. कारण फक्त इतकेच की, त्या नर्सने म्हटले होते की मर्कझमध्ये सहभागी झालेल्या मुस्लिमांनी जर स्वतःहून क्वारंटाईन झाले असते तर आज आपल्यावर ही परिस्थिती ओढावली नसती.

Hafeez-1.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आंधप्रदेशीमधील कुर्नूलमध्ये असे काही घडले का याचा शोध घेतला. तेव्हा वन इंडियाच्या तेलुगू भाषेतील वेबसाईटवरील 23 एप्रिल रोजीची एक बातमी आढळली. या बातमीनुसार, हा फोटो कुर्नूल रायालसिमा विद्यापीठातील क्वारंटाईन केंद्रातील आहे. सदरील फोटोतील व्यक्तीच्या डाव्यापायाला जखम झाल्यामुळे रक्त येत होते. ते थांबविण्याचा नर्स प्रयत्न करीत होती. सोबत या घटनेचे वेगवेगळे फोटोदेखील या बातमीत दिलेले आहे. त्यात व्यक्तीच्या पायाला जखम झाल्याचे स्पष्ट दिसते.

xhafeez-1-1587629646.jpg.pagespeed.ic.-LXgGcbMC5.jpg

मूळ बातमी येथे वाचा – वन इंडिया तेलुगू

कुर्नूल येथील रायालसिमा विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये क्वारंटाईन केंद्र सुरू करण्यात आले आहे. हा फोटो तेथील आहे. तो कुर्नूल मेडिकल कॉलेजमधील नाही.

साक्षी टीव्ही न्यूज चॅनेलवरदेखील या फोटोसंदर्भात बातमी प्रकाशित केल्याचे आढळले. 23 एप्रिल रोजीच्या या बातमीतही अशीच माहिती आहे की, सोशल मीडियावर हा फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे. आमदार हाफिज खान यांनी क्वारंटाईन केंद्राला भेट दिली तेव्हा एका व्यक्तीच्या पायाला जखमी झाली होती. फोटोतील नर्स त्या जखमी व्यक्तीवर प्राथमिक उपचार करीत होती. खाली साक्षी न्यूजच्या वेबसाईटवर या जखमी व्यक्तीचा व्हिडियो दिलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

कुर्नूल पोलिसांनीदेखील या प्रकरणाची दखल घेत खुलासा केला आहे की, सदरील फोटोतील नर्स ही त्या जखमी व्यक्तीवर उपचार करीत होती. पोलिसांनी फेसबुक पोस्ट करीत माहिती दिली की, स्थानिक क्वारंटाईन सेंटरमधील या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास आहे. तसेच त्याची दृष्टीदेखील कमजोर आहे. पायाला गेट लागल्यामुळे त्याला जखमी झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले. मधुमेही व्यक्तीसाठी हे प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे तेथे उपस्थित नर्सने या व्यक्तीच्या पायाला कापूस व बँडेज लावून प्रथमोपचार केले. नंतर या व्यक्तीला कुर्नूलच्या सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले. फोटोतील नर्सने तिचे कर्तव्य बजावले. परंतु, सोशल मीडियावर या फोटोवरून अनेक खोटे दावे करण्यात येत आहेत. त्यावर विश्वास ठेवू.

Kurnool-1.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

स्थानिक आमदार हाफिज खान यांनी 31 मार्च रोजी या क्वारंटाईन केंद्राला भेट दिली होती. तबलिगी जमातच्या सदस्यांना रायालसिमा विद्यापीठाच्या वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले होते. तेथील सोयीसुविधांची पडताळणी करण्यासाठी आमदार खान गेले होते. या दरम्यान केलेल्या पाहणीचे त्यांनी फोटो शेयर केले होते. खाली एम्बेड केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ते पाहू शकता.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

सदरील व्हायरल फोटो सोशल मीडियावर चुकीच्या दाव्यासह फिरू लागल्यानंतर हाफिज खान यांनी फेसबुक पेजवरून याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी माहिती दिली की, मी जेव्हा क्वारंटाईन केंद्राला भेट दिली होती तेव्हा ही घटना घडली होती. सदरील व्यक्ती जखमी झाला होता. त्याच्या पायाला जबर जखम झाल्याने रक्त वाहत होते. नर्सने त्याच्या जखमेवर उपचार केले. खोट्या आणि सांप्रदायिक दाव्यासह हा फोटो पसरविण्यात येत आहे.

या व्हायरल फोटोमध्ये जी नर्स दिसत आहे तिचे नाव सरस्वती असून त्यांनी स्वतः याविषयी खुलासा केला आहे की, माझ्यावर पाय धरण्याचा दबाव टाकण्यात आला नव्हता. जखमी व्यक्तीवर उपचार करणे माझी जबाबादारी असून मी तेच काम करीत होते. व्हायरल पोस्टमध्ये त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात येत आहे. तिच्या खुलाशाच व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, आमदार हाफिज खान यांनी नर्सला मौलानाचे पाय धरण्यास दबाव टाकला नव्हता. या फोटोचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. सदरील व्यक्तीच्या पायाला जखमी झाल्याने ही नर्स त्याच्यावर प्रथोमपचार करीत होती. ती पाय पकडून माफी मागत नव्हती.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:आमदार हाफिज खान यांनी नर्सला मौलानाचे पाय पकडून माफी मागायला लावली नाही; वाचा या व्हायरल फोटोमागील सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False