तथ्य पडताळणी : देशात प्लास्टिकची अंडी विकली जात आहेत का?

False आरोग्य

(फोटो सौजन्य : झी 24 तास)

भारतात नकली अंडी बाजारात .जनतेच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ ,अन्न औषध प्रशासन झोपेत. नकली अंडी ओळखण्यासाठी ६ टिप्स असे सांगत सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या माहितीची सत्यता तपासण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोकडे एक विनंती आली होती. त्यानंतर फॅन्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

देशात आणि महाराष्ट्रात खरंच अशी प्लास्टिकची अंडी विकली जात आहेत का? पोस्टकर्त्याने दावा केल्याप्रमाणे अन्न आणि औषध प्रशासन झोपेत आहे का? ही अंडी देशात किंवा परदेशात कुठे बनवली जात आहेत याची पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. याचा शोध असताना सर्व प्रथम आम्हाला महाराष्ट्र टाईम्सचे एक एप्रिल 2017 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तात कोलकाता इथल्या एका दुकानदाराला ही प्लास्टिकची नकली अंडी विकण्याप्रकरणी अटक करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

अक्राईव्ह

महाराष्ट्र टाईम्सच्या या वृत्तामुळे भारतात विविध ठिकाणी प्लास्टिकची अंडी मिळत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. त्यानंतर महाराष्ट्रातही 6 एप्रिल 2017 रोजी प्लास्टिकची अंडी सापडल्याचा दावा करण्यात आल्याचे वृत्तही आमच्या नजरेत आले.

अक्राईव्ह

अंडयाबाबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु असताना त्यावर कोणीही कशी प्रतिक्रिया दिलेली नाही, असा प्रश्न आम्हाला पडला. त्यामुळे आम्ही याबाबत अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे अध्यक्ष पी. के. भगत याची प्रतिक्रिया दिसून आली. प्लास्टिकचे अंडे ही केवळ अफवा असून देशात प्लास्टिकचे एकही अंडे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शिवाजी देसाई, डॉ. पी. जी. पेडगावकर, डॉ. अर्चना ठोंबरे, वसंतकुमार शेट्टी  यांची प्रतिक्रियाही या वृत्तात दिसून येते.

अक्राईव्ह

गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिकची अंडी बाजारात विकली जात असल्याची माहिती सोशल मीडियावरून फिरत आहे. या अफवांमुळे शेतकरी, अंडी उत्पादक आणि ग्राहक यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे मटाने या वृत्तात नमूद केले आहे.

साम मराठी या सकाळ वृत्तपत्र समुहाच्या वृत्तवाहिनीनेही याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तातही महाराष्ट्रात अशी प्लास्टिक अंडी मिळत नसल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी स्पष्ट केले आहे. झी 24 तास या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळानेही राष्ट्रीय अंडी समन्वय समितीनं प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

अक्राईव्ह

निष्कर्ष

भारतात विशेषत: महाराष्ट्रात प्लास्टिकची अंडी मिळत आहेत हे असत्य आहे. चीनमध्ये अशा अंडयाचे उत्पादन होत असले तरी भारतात ती आणणे आर्थिकदृष्टया परवडणारे नसल्याचेही स्पष्ट होते. अन्न आणि औषध प्रशासनही वेळोवेळी अंड्यांची तपासणी करत असते. त्यामुळे पोस्टमधील व्हिडिओद्वारे भारतात अशी अशी मिळत असल्याची अफवा पसरविण्यात येत असल्याचे दिसून येते. अशा अफवांमुळे शेतकरी, अंडी उत्पादक आणि ग्राहक यांचे मोठे नुकसान होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी ही पोस्ट भारत आणि महाराष्ट्राबाबत असत्य आढळली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : देशात प्लास्टिकची अंडी विकली जात आहेत का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False