Fact Check : शिवसेना भवनावर सोनिया गांधीचा फोटो झळकला का?

False राजकीय

महाराष्ट्रात महाराष्ट्र विकास आघाडीचे गठन झाल्यानंतर शिवसेना भवनावर सोनिया गांधी यांचे पोस्टर लावण्यात आल्याचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. शपथविधीच्या तोंडावर शिवसेना भवनचे नवीन रूप आणि रोषणाई, अशा कॅप्शनसह हा फोटो शेयर केला जात आहे. अशी माहिती देत मराठा आरक्षण आणि श्रृती गांवकर यांनीही हे छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.

screenshot-www.facebook.com-2019.11.29-16_04_23.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनावर खरोखरच सोनिया गांधी यांचे पोस्टर लावण्यात आले होते का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स सर्च केले. त्यावेळी आम्हाला असे कोणतेही छायाचित्र दिसून आले नाही. 

अधिक शोध घेतला असता इंडिया टूंडेच्या बातमीत उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीपूर्वी शिवसेना भवनाजवळ बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे फोटो लावल्याचे म्हटले आहे. 

indiatoday.in-2019.11.29-16_54_27.png

इंडिया टूडेचे मुळ वृत्त / Archive

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने शिवसेना भवन येथे जल्लोष सुरु असताना नेमकी काय स्थिती आहे याचे वृत्त दिले होते. या वृत्तातही शिवसेना भवन स्पष्ट दिसत आहे. यातही अशा प्रकारचे कोणतेही पोस्टर दिसत नाही. शिवसेना भवनाबाहेर सेव्ह आरे असे फलक झळकविण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

नेटवर्क 18 ने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर सेना भवनाजवळ झालेल्या वाहतूक कोंडीचे वृत्त दिले असून या छायाचित्रात आपण शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असल्याचे स्पष्ट पाहू शकतो.  

screenshot-www.news18.com-2019.11.29-17_53_03.png

नेटवर्क 18 चे मुळ वृत्त / Archive

याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीपूर्वीचे एक छायाचित्रही या गॅलरीत आहे. याठिकाणीही बाळासाहेब ठाकरे यांचेच छायाचित्र दिसून येते. यातून हे स्पष्ट होते. शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचेच छायाचित्र पूर्वीही होते आणि आताही आहे. 

निष्कर्ष

संशोधनातून हे स्पष्ट होते की, शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचेच छायाचित्र आहे. फोटोशॉप करून त्याजागी सोनिया गांधी यांचा फोटो लावून तो व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:Fact Check : शिवसेना भवनावर सोनिया गांधीचा फोटो झळकला का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False