माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्याविषयीचे हे वृत्तपत्र कात्रण खोटे

False राजकीय सामाजिक

अवैध वेश्या व्यवसाय आणि अपहारप्रकरणी हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तीस शिक्षा बी. जी. कोळसे-पाटील यांना ५ वर्षे सक्त मजुरी असे शीर्षक असलेल्या बातमीचे कात्रण सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. विकास बोडस यांनीही हे कात्रण हीच ह्याची खरी ओळख  ! अन् हे म्हणे. ‘सन्माननिय’ ………… अशा ओळींसह पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

kolse Patil.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी 

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्याविषयीचे हे वृत्त सत्य आहे का, याचा शोध आम्ही घेतला. त्यावेळी अशा स्वरुपाचे एकही वृत्त आम्हाला आढळून आले नाही. त्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी स्थापन केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील अध्यक्ष असलेल्या लोकशासन आंदोलन पार्टीच्या फेसबुक पेजला भेट दिली.

याठिकाणी आम्हाला त्यांनी 21 एप्रिल 2015 रोजी केलेला एक खुलासा दिसून आला. यात दिलेल्या माहितीनूसार दैनिक फुलवात नावाचे दैनिक पंढरपुरमधून प्रकाशित होत नाही. हा आपल्या बदनामीचा कट असल्याचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्याविरोधात त्यांनी पोलिसांकडे फिर्यादही दिली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.02.20-14_47_06.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

पुणे मिरर या संकेतस्थळाने 23 एप्रिल 2015 रोजी बी. जी. कोळसे-पाटील यांनी पुणे पोलिसांकडे तक्रार दिल्याचे वृत्त प्रसिध्द केल्याचेही आम्हाला दिसून आले. या वृत्तात राधेश पोपट बदाले हा या प्रकरणातील आरोपी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचेही म्हटले आहे. दैनिक फुलवात नावाचे बनावट वृत्तपत्र तयार करत बी. जी. कोळसे-पाटील यांची बदमानी करण्यासाठी त्याने हे असत्य वृत्त प्रसिध्द केले होते. बदाले हा कोळसे-पाटील सोलापूर येथे चालवत असलेल्या संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळा या विश्वस्त संस्थेत व्यवस्थापक होता.  गैरव्यवहार केल्याने त्याच्यावर 5 खटले सुरू असून त्यापैकी एका फसवणुक प्रकरणात त्याला शिक्षा झाल्याने बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले

Pune mirror.png

पुणे मिररमधील मुळ वृत्त / Archive

निष्कर्ष

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्या संस्थेतील माजी व्यवस्थापकाने बनावट वृतपत्र बनवले. त्यात हे वृत्त प्रसिध्द केले होते. हे वृत्त असत्य आहे. 

Avatar

Title:माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्याविषयीचे हे वृत्तपत्र कात्रण खोटे

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False