पंजाबमध्ये या मुलीची गोळी घालून हत्या केली का? : सत्य पडताळणी

True सामाजिक

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एका तरुणीचा फोटो देण्यात आला असून, या तरुणीला पंजाबमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट अजीत गिजारे यांच्या फेसबुक अकाउंटवर                                    22 वेळा शेअर झाली असून, 76 लाईक्स आणि 29 कमेंटस् मिळाले आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर विविध फेसबुक पेज आणि अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट व्हायरल झालेली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये एका तरुणीचा फोटो दाखवून असा दावा करण्यात आला आहे की, या तरुणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यासाठीचे सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील तरुणीच्या फोटोला गुगल रिव्हर्स इमेजमध्ये शोधले.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तरुणीचे नाव डॉ. नेहा सुरी असे आहे. या तरुणीबद्दल विविध प्रसार माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्या आहेत.

नॅशलन दुनियाअर्काईव्ह

पंजाब न्युज एक्सप्रेसअर्काईव्ह

डॉ. नेहा सुरी या ड्रग इनस्पेक्टर होत्या. त्यांची पंजाबमध्ये रोपर जिल्ह्यात पोस्टिंग झाली असताना, एका केमिस्टचे लायसन्स रद्द कर केल्यामुळे राग येवून डॉ. नेहा यांची गोळी घालून हत्या केली. ही हत्या 29 मार्च 2019 रोजी झाली आहे.

या विषयावर युटुयब चॅनलवर डॉ. नेहा सुरी ड्रग इनस्पेक्टर या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये डॉ. नेहा सुरी यांची हत्या कशी करण्यात आली हे सांगण्यात आले आहे.

अर्काईव्ह

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तरुणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे, हे वृत्त सत्य आहे.

Avatar

Title:पंजाबमध्ये या मुलीची गोळी घालून हत्या केली का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: True