Fact Check : चाईल्डलाईन संस्थेबाबत व्हायरल होणारा हा संदेश किती सत्य?

False सामाजिक

तुम्हांला नम्र विनंती आहे कि ह्यापुढे तुमच्या घरात कोणताही कार्यक्रम वा सभारंभ असेल व अन्न थोडेसेही ज्यास्त झाले असेल वा वाया जाण्याची शक्यता असेल तर आपण न संकोचता चाइल्ड हेल्पलाईन ला फोन करा. ते येतील आणी सर्व अन्न एकत्रीत करून घेवून जातील, असा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

चाईल्डलाईन संस्थेबाबत प्रसारित होत असलेल्या या संदेशाची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम चाईल्डलाईन या संस्थेच्या संकेतस्थळास भेट दिली. त्यावेळी याठिकाणी आम्हाला अशी कोणतीही माहिती दिसून आली नाही.

अक्राईव्ह

त्यानंतर आम्हाला या संस्थेचा इंग्रजी भाषेतील एक संदेश दिसून आला. या संदेशात स्पष्ट म्हटले आहे की, तुमच्या घरातील उरलेले अन्न उचलण्यासाठी 1098 या क्रमांकावर फोन खरा हा संदेश पुर्णपणे खोटा आहे. ज्या मुलांना संरक्षणाची आणि काळजीची गरज आहे, अशा मुलांसाठी 1098 हा क्रमांक आहे. आम्ही अन्न उचलत नाही आणि त्याचे वितरण करत नाही. चाईल्डलाईनच्या नावाने पसरविण्यात येणारा चुकीचा संदेश आमचा नाही. या आपले सहकार्य अपेक्षित आहे.

‘ज्ञानदेवी’ संस्थेमार्फत पुण्यामध्ये 2001 मध्ये ‘चाईल्डलाईन’ सेवा सुरू झाली. या संस्थेच्या वाटचालीवर एक लेख डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांनी दैनिक लोकसत्तामध्ये लिहिला आहे. या लेखाद्वारे तुम्ही चाईल्डलाईन संस्थेविषयी अधिक जाणून घेऊ शकता.

अक्राईव्ह

विकासपीडियावर चाईल्ड लाईन हा केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या शून्य ते 19 वयोगटातील मुला-मुलींकरिता 24 तास कार्यरत असणारी मोफत सेवा आहे, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. दैनिक सकाळने चाईल्डलाईन या संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील 29 बालविवाह रोखल्याचे वृत्त 14 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिध्द केल्याचे दिसून येते.

निष्कर्ष

पुण्यामध्ये ‘ज्ञानदेवी’ संस्थेमार्फत 2001 मध्ये सुरु झालेली ‘चाईल्डलाईन’ हा आता केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या शून्य ते 19 वयोगटातील मुला-मुलींकरिता 24 तास कार्यरत असणारी मोफत सेवा आहे. बालविवाहासारख्या कुप्रथा रोखण्याचे कार्य ही संस्था करत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत चाईल्डलाईन ही संस्था उरलेले अन्न एकत्र करुन त्याचे वितरण करते, ही माहिती असत्य आढळून आली आहे.

Avatar

Title:Fact Check : चाईल्डलाईन संस्थेबाबत व्हायरल होणारा हा संदेश किती सत्य?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False