बालवाडीतील मुलांसोबत खेळत असलेले हे खरे डोनाल्ड ट्रम्प नाहीत. वाचा सत्य काय आहे

False आंतरराष्ट्रीय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या बहुचर्चित भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावे एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती बालवाडीतील मुलांसोबत खेळताना दिसतो. मग त्यांचा एक साथीदार त्यांना घ्यायला येतो तेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे “ट्रम्प” जमिनीवर लोळून-पडून विरोध करतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खरंच असे वागू शकतात का याविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी करून या व्हिडियोचे सत्य समोर आणले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर कळते की, डाव्या बाजूसवर C लिहिलेले आहे. अमेरिकेत विनोदी कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असेलेल्या कॉमेडी सेंट्रल या वाहिनीचा हा लोगो आहे. त्यानुसार, की-वर्ड्सद्वारे सर्च केले असता कळाले की, कॉमेडी सेंट्रल वाहिनीने तयार केलेल्या The President Show नावाच्या एका व्यंगात्मक मालिकेतील हा व्हिडियो आहे. खाली दिलेल्या व्हिडियोच्या 4.00 मिनिटापासून सदरील पोस्टमधील व्हायरल क्लिप सुरू होते.

मालिका टाईम मासिकानेदेखील या एपिसोडबद्दल बातमी दिली होती. त्यानुसार, कॉमेडी सेंट्रलवरील ‘द प्रेझिडेंट शो’मध्ये अँथनी अटामानुईक ट्रम्पची भूमिका साकारतो. या भागात तो बालवाडीतील मुलांच्या शाळेला भेट देतो आणि मुलांमध्ये मुलांसारखे वागायला लागतो. शेवटी “अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष” त्यांना नेण्यासाठी येतात तेव्हा “ट्रम्प’ लहान मुलांसारखे रडू लागतात. हा सगळा विनोद आहे.

मूळ बातमी येथे वाचा – टाईमअर्काइव्ह

The President Show 

डोनाल्ड ट्रम्पची हुबेहुब नक्कर करण्यासाठी प्रसिद्ध असलेला अँथनी अटामानुईक याने ही मालिका 2017 साली तयार केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील विविध व्यंगात्मक स्कीट्स यामध्ये केले जातात. या मालिकेचे एकुण 20 एपिसोड आणि 4 स्पेशल भाग कॉमेडी सेंट्रल वाहिनीवर प्रसारित झाले होते.

निष्कर्ष

बालवाडीतील मुलांमध्ये खेळणारे हे खरे डोनाल्ड ट्रम्प नाहीत. कॉमेडी सेंट्रल वाहिनीवरील ‘द प्रेझिडेंट शो’ या व्यंगात्मक मालिकेतील हा व्हिडियो आहे. व्हिडियोत दिसणारा कलाकार डोनाल्ड ट्रम्प यांची नक्कल करीत आहे.

Avatar

Title:बालवाडीतील मुलांसोबत खेळत असलेले हे खरे डोनाल्ड ट्रम्प नाहीत. वाचा सत्य काय आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False