FAKE NEWS: ‘मंदिर चाहिए’ म्हणणाऱ्या या व्यक्तीचे निधन झालेले नाही

False राजकीय

एका व्हिडिओमध्ये “हमें हॉस्पिटल नहीं, मंदिर चाहिए” असे विधान करणाऱ्या व्यक्तीचे ऑक्सिजन न भेटल्यामुळे लखनऊमध्ये निधन झाले, अशा पोस्ट व्हायरल होत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. सदरील व्यक्तीचे निधन झालेले नाही.

काय आहे दावा?

एका व्यक्तीचा फोटो शेअर करून म्हटले की, “हा जो व्यक्ती आहे जो भाजपचा खूप मोठा भक्त होता. एका चॅनलला मुलाखत देताना बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणत होता की, हमे हॉस्पिटल नहीं मंदिर चाहिए. आज ऑक्सिजन न भेटल्यामुळे लखनऊमध्ये ह्यांच निध झालं. देव त्यांच्या आत्म्याला शांती आणि भक्तांना बुद्धी देवो.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

याबाबत शोध घेतल्यावर कळाले कळाले की, व्हायरल होत असलेल्या फोटोतील व्यक्तीचे  नाव जितेंद्र गुप्ता आहे. 2019 मध्ये स्कुपहूप नावाच्या एका युट्युब चॅनेलवरील एका व्हिडिओमध्ये त्यांनी हमें हॉस्पिटल नहीं, मंदिर चाहिए”, असे म्हटले होते. हा व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता.

दिल्लीतील भाजपचे नेते रविंद्र सिंग नेगी यांनी फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली की, “ये मेरे परम मित्र जीतू गुप्ता जी जो पटपड़गंज विधानसभा दिल्ली  में एक समाज सेवी है जो बिल्कुल स्वस्थ और ठीक किसी प्रकार कि कोई बीमारी नही है ये अपने घर पर  है। किसी ने उनकी मरने कि फ़र्ज़ी खबर डाली है ।जिसने भी ये खबर डाली हम उसके खिलाफ़ Police में FIR दर्ज कराएँगे।“

मूळ पोस्ट – फेसबुक

फॅक्ट क्रेसेंडो मराठीने नेगी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, जितेंद्र गुप्ता यांचे निधन झालेले नाही. त्यांच्या नावाने खोटी बातमी पसरविली जात आहे. गुप्ता हे दिल्लीत राहतात, लखनऊमध्ये नाही. 

यानंतर आम्ही जितेंद्र गुप्ता यांच्याशीसुद्धा संपर्क साधला. त्यांनी व्हायरल होत असलेल्या बातम्यांचे खंडन केले.

“मी स्वस्थ असून माझ्या निधनाची खोटी बातमी शेअर करणाऱ्यांविरोधात मी सायबर पोलिसांकडे तक्रार केलेली आहे,” असे त्यांनी सांगितले.

गुप्ता यांनी फॅक्ट क्रेसेंडोकडे एक व्हिडिओ मेसेज आणि मधुविहार पोलिस ठाण्यातील सायबर तक्रार अर्जसुद्धा पाठवला.

“माझ्या निधनाच्या सोशल मीडियावरील मेसेज खोटे असून, कोणीही ते शेअर करू नये,” असे गुप्ता यांनी आवाहन केले आहे.

निष्कर्ष

यावरुन स्पष्ट होते की, “हमें हॉस्पिटल नहीं, मंदिर चाहिए” असे विधान करणाऱ्या व्यक्तीचे निधन झालेले नाही. त्यांच्या निधनाच्या खोट्या पोस्ट व्हायरल होत आहेत.

Avatar

Title:FAKE NEWS: ‘मंदिर चाहिए’ म्हणणाऱ्या या व्यक्तीचे निधन झालेले नाही

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False