अंड्यातून पिल्ले बाहेर पडल्याचा व्हिडिओ पाकिस्तानमधील; वाचा सत्य

Coronavirus False आंतरराष्ट्रीय | International

जगभरात पंधरा लाखाहून अधिक जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे 92 हजार 798 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. भारतातही सहा हजार 412 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यंत 199 जणांचा त्यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूंची लागण झालेल्याची संख्या एक हजारावरुन अधिक आहे. त्यामुळे आतापर्यंत 64 जणांचा मृत्यू झाला आहे. चिकन आणि अंडी खाल्ल्याने कोरोना विषाणूची लागण होते, अशा गैरसमजामुळे पोल्ट्री व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. या व्हिडिओत रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत कोंबडीची पिल्ले दिसत असून ती भारतीय पोल्ट्री व्यवसायिकांनी फेकुन दिलेल्या अंडयातून ती बाहेर पडल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? हे शोधण्यासाठी या व्हिडिओतील काही दृश्ये घेऊन ती रिव्हर्स इमेज केली. त्यावेळी जो परिणाम मिळाला. त्यात व्हॉईस ऑफ पाकिस्तान हे फेसबुक पेज आम्हाला दिसून आले. या पेजवर हा व्हिडिओ 29 मार्च 2020 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. कराची या शहरालगतच्या उत्तर बाह्यवळण महामार्गावरील हा व्हिडिओ आहे. 

Archive

त्यानंतर All About Here या फेसबुक पेजवरही 27 मार्च 2020 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे दिसून आले. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीतही हा कराचीतील उत्तर बाह्यवळण महामार्गावरील व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. या कोंबडयांच्या पिल्लांना कोणत्या विषाणूची लागण तर झाली नाही ना, याची तपासणी करुन नागरिक त्या ती नेत आहेत.

Archive

त्यानंतर आम्हाला पाकिस्तानच्या jeeveypakistan.com संकेतस्थळावर 29 मार्च 2020 रोजी याबाबतचे वृत्तही दिसून आले. या वृत्तानुसार ईशान्य महामार्गावर पोल्ट्री मालक व्यावसायिक कामकाज ठप्प झाल्याने आपले अधिक नुकसान टाळण्यासाठी एक दिवसाची कोंबडीची पिल्लं सोडून देत आहेत. 

image2.png

jeeveypakistan.com / Archive

निष्कर्ष

हा व्हिडिओ पाकिस्तानमधील कराची या शहरातील आहे. भारतातील अथवा महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातील तो असल्याचा दावा असत्य आहे. 

Avatar

Title:अंड्यातून पिल्ले बाहेर पडल्याचा व्हिडिओ पाकिस्तानमधील; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False