कंगना रणौतने झाशीच्या राणीचा अपमान केला का? वाचा त्या व्हिडिओमागील सत्य

False सामाजिक

सध्या वादग्रस्त ठरत असलेली अभिनेत्री कंगना रणौतने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा अपमान केला, अशा दाव्यासह एक क्लिप फिरत आहे. या व्हिडिओमध्ये कंगना झांसी की रानी क्या मेरी चाची हैं असे म्हणते. यावरून तिने राणी लक्ष्मीबाई यांची खिल्ली उडवली, असा प्रचार केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने तपासणी केली असता व्हायरल होत असलेली क्लिप एटिड करून संदर्भाशिवाय पसरविली जात असल्याचे समोर आले.

काय आहे दावा?

केवळ 20 सेकंदाच्या क्लिपमध्ये कंगना म्हणते की, “याचा मला काय फायदा होणार आहे. मला ऑलरेडी तीन-चार राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. वयाच्या 31 व्या वर्षी मी फिल्म दिग्दर्शक आहे. हे लोकं मला काय प्रोमोट करतील. यांनी जर स्वतःलाही प्रोमोट केले तर खूप झाले. पण जी झाशीची राणी आहे ती काय माझी काकू आहे?”

मूळ व्हिडिओ येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम मूळ व्हिडिओ शोधून काढणे गरजेचे आहे. की-वर्ड्सद्वारे सर्च केले असता कळाले की, कंगनाने हे विधान गेल्या वर्षी ‘मणकर्णिका’ सिनेमाच्या प्रोमोशनदरम्यान केले होते. “झांसी की रानी क्या मेरी चाची हैं” तिचे हे वाक्य त्यावेळी बरेच गाजले होते.

‘एनडीटीव्ही’च्या 9 फेब्रुवारी 2019 रोजीच्या बातमीनुसार, बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी कंगनाच्या ‘मणकर्णिका’ सिनेमाबद्दल सोशल मीडियावर काहीच लिहिले अथवा प्रोमोट केले नाही. त्याबद्दल एक पत्रकाराने तिला प्रश्न विचारला होता की, इंडस्टीतून काही सपोर्ट मिळाला असता तर तिच्या सिनेमाला फायदा झाला असता क? 

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्ही

या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली होती की, इंडस्ट्रीतील कलाकारांची तिला गरज नाही. ती स्वतःच्या दमावर यशस्वी आहे. 

अगर वे मेरा समर्थन करते तो भी मुझे क्या फायदा होता? मैं पहले ही 3-4 राष्ट्रीय पुरस्कार जीत चुकी हैं. मैं 31 वर्ष की हूं और फिल्मकार हूं. मुझे प्रचार के लिए किसी की आवश्यकता नहीं है, लेकिन मेरा सवाल है कि झांसी की रानी क्या मेरी चाची है?” असे ती म्हणाली होती.

पुढे ती म्हणाली की, ”वो (झांसी की रानी) जो आपके लिए हैं, वही मेरे लिए भी हैं. फिर ये लोग इतने क्यों डरे हैं? सिर्फ इसलिए कि मैंने वंशवाद, भाई-भतीजावाद के बारे में बात की और इससे वे हिल गए और उन्होंने मेरे खिलाफ गैंग बना लिया.” 

[झाशीची राणी जशी माझी आहे तशी तुमचीसुद्धा आहे. तर मग हे कलाकार का घाबरत आहेत? फक्त मी नेपोटिज्म विषयी बोलले म्हणून त्यांनी माझ्याविरोधात गटबाजी सुरू केली आहे.]

‘मुंबई तक’ या चॅनेलवर या कार्यक्रमाचा व्हिडिओ. त्यात संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर कळते की, सध्या व्हायरल होत असलेली कंगनाची क्लिप एटिड करून अर्धवट फिरवली जात आहे.

सध्या व्हायरल असलेलील क्लिप आणि मूळ व्हिडिओ यांची तुलना करून पाहू.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, कंगनाने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची खिल्ली उडवली नव्हती. तिच्या विधानाची अर्धवट क्लिप संदर्भाशिवाय फिरवून चुकीची माहिती पसरविली जात आहे.

Avatar

Title:कंगना रणौतने झाशीच्या राणीचा अपमान केला का? वाचा त्या व्हिडिओमागील सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False