सत्य पडताळणी : घातक विमानं उतरविण्याची क्षमता असलेले महामार्ग

Mixture/अर्धसत्य राष्ट्रीय

भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांसाठी उत्तर प्रदेशातील एक्स्प्रेस वे पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा टीव्ही 9 मराठी या संकेतस्थळाने केला आहे.  आपत्कालिन परिस्थिती किंवा युद्धजन्य परिस्थितीत या एक्स्प्रेस वेवर विमानं उतरवली जाऊ शकतात, असं या वृत्तात म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तात किती तथ्य आहे हे फॅक्ट क्रिसेन्डोने जाणून घेतले आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

यमुना एक्सप्रेस-वे आणि आग्रा-लखनऊ एक्सप्रेस-वेवर हवाई दलाने यापूर्वी आपली लढावू विमाने उतरवली होती, असे वृत्त दैनिक अमर उजालाने प्रसिध्द केलेले आहे. पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर ही सुविधा भविष्यात उपलब्ध होऊ शकते, असेही या वृत्तात म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

वायूसेनेच्या लढाऊ विमानांसाठी आता गाझीपूरपर्यंत बनलेल्या पूर्वांचल एक्स्प्रेवेवरही ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, टीव्ही 9 मराठीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. नवभारत टाईम्सने 21 डिसेंबर 2018 रोजी दिलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 24 महिन्यात हा महामार्ग पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. याचाच अर्थ या महामार्गाचे बरेचशे काम अजून बाकी आहे.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

आपत्कालिन परिस्थितीत किंवा युद्धजन्य परिस्थितीत एक्स्प्रेस वेवर विमानं उतरवली जाऊ शकतात, हे खरे आहे. वायूसेनेच्या लढाऊ विमानांसाठी आता गाझीपूरपर्यंत बनलेल्या पूर्वांचल एक्स्प्रेवेवरही ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे मात्र खोटे आहे. या एक्स्प्रेवेचे काम अद्याप सुरु आहे. त्यामुळे टीव्ही 9 मराठीने याबाबत दिलेले वृत्त अर्धसत्य आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : घातक विमानं उतरविण्याची क्षमता असलेले महामार्ग

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture