नवनीत राणा यांना ‘जय श्रीराम’ या घोषणेचा त्रास होत आहे म्हणे अशा खासदार निवडून आणल्याबद्दल अमरावतीच्या लोकांचे अभिनंदन, अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

नवनीत राणा यांना ‘जय श्रीराम’ या घोषणेचा त्रास होत आहे का? त्यांनी नवनीत राणा यांनी जय श्रीरामच्या घोषणेबाबत काय भूमिका मांडली याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी आम्हाला दैनिक लोकसत्ताचे खालील वृत्त दिसून आले. महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जय श्रीरामचे नारे संसदेत देणं योग्य नाही, अशी भूमिका मांडल्याचे दिसून येत आहे. जय श्रीरामचे नारे देण्यासाठी संसद ही योग्य जागा नाही. त्याचासाठी मंदिरं आहेत, असं त्यांनी म्हटले आहे. त्यांनी कुठेही आपल्याला ‘जय श्रीराम’ या घोषणेचा त्रास होत आहे, असे म्हटलेले नाही.

Archive

एएनआय या वृत्तसंस्थेनेही याबाबतचे ट्विट केल्याचे दिसून येत आहे. हे ट्विट तुम्ही खाली पाहू शकता.

https://twitter.com/ANI/status/1140559529941315584

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक सामनानेही याबद्दलचे वृत्त दिले आहे. या वृत्ताच्या शीर्षकातही संसदेतील ‘जय श्रीराम’च्या घोषणांवर खासदार नवनीत कौर यांचा आक्षेप असे स्पष्टपणे म्हटले आहे. खासदार नवनीत कौर काय म्हणाल्या याबाबत सामनाने खालीलप्रमाणे म्हटले आहे.

खासदार नवनीत कौर म्हणाल्या, ‘जय श्रीरामच्या घोषणा देण्याचे हे योग्य स्थान नाही, त्यासाठी मंदिरं आहेत. सर्वच देव सारखेच आहेत, परंतु एकाच देवाच्या नावाच्या घोषणा देणे अयोग्य आहे.

Archive

मराठी हिंदूस्थान टाईम्सने याबाबतचे वृत्त देताना लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणा देणे अयोग्य, असे नवनीत कौर राणा यांनी म्हटल्याचे म्हटले आहे. अशा स्वरुपाच्या घोषणा देण्याचे हे स्थान नाही. त्यासाठी मंदिरे बांधलेली आहेत. सर्व देव एकसारखेच आहेत. पण एखाद्याला लक्ष्य करणे आणि कोणाचे तरी नाव घेणे हे अत्यंत चुकीचे आहे, असे राणा म्हणाल्याचे मराठी हिंदूस्थान टाईम्सने नमूद केले आहे.

Archive

निष्कर्ष

महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जय श्रीरामचे नारे संसदेत देणं योग्य नाही, अशी भूमिका मांडल्याचे दिसून येत आहे. जय श्रीरामचे नारे देण्यासाठी संसद ही योग्य जागा नाही. त्यासाठी मंदिरं आहेत, असं त्यांनी म्हटले आहे. त्यांनी कुठेही आपल्याला ‘जय श्रीराम’ या घोषणेचा त्रास होत आहे, असे म्हटले असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : नवनीत राणा यांना जय श्रीरामच्या घोषणेचा त्रास होत आहे का?

Fact Check By: Dattatray Gholap

Result: False