आसाममध्ये काँग्रेसचे नेते अमजात अली यांना सफरचंदाच्या पेटीसोबत हत्यारे आणि काडतुसे असताना अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होती, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत. या माहितीची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

काय आहे दावा?

आसाममधील काँग्रेसचे नेते अमजात अली यांना हत्यारांसह अटक करण्यात आली आहे.

Assam.png

Facebook | Archive

तथ्य पडताळणी

आसाममधील काँग्रेसचे नेते अमजात अली हे कोण आहेत, याचा शोध घेतला. त्यावेळी आसाम काँग्रेसमध्ये अशा नावाची कोणतीही व्यक्ती कार्यरत असल्याचे दिसून आले नाही. आसाम काँग्रेसनेही अशी कोणतीही व्यक्ती काँग्रेसमध्ये असल्याचा इन्कार केला.

छायाचित्र क्र. 1-

छायाचित्रात निळ्या गणवेशातील पोलिसांसोबत अटक दाखविण्यात आलेली व्यक्ती कोण आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. याचा यांडेक्सच्या मदतीने शोध घेतला असता हे बांगलादेश पोलीस असल्याचे दिसून आले. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने या व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याचे बंगला संगबाद या ब्लॉगवर 17 मे 2018 रोजी म्हटले आहे.

BANGLA BLOG.png

BLOG Link | Archive

छायाचित्र क्र. 2-

सफरचंदाची पेटी, काही हत्यारे आणि काडतूसे असलेले हे छायाचित्र कुठले आहे याचा शोध घेतला. त्यावेळी ग्रेटर काश्मीर या संकेतस्थळावर 29 ऑक्टोबर 2018 रोजी प्रकाशित झालेले एक वृत्त दिसून आले. काश्मीरमध्ये पोलिसांसोबत दहशतवाद्याच्या झालेल्या एका चकमकीच्या ठिकाणचे हे द्दश्य असल्याचे या म्हटले आहे. या चकमकीच्या ठिकाणी तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

Greater Kashmir.png

Greater Kashmir | Archive

फ्री प्रेस काश्मीर, द काश्मीर इमेजेस, काश्मीर ऑब्झरवर, Daily Excelsior.com या संकेतस्थळांनी आणि पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले असल्याचे आपण पाहू शकता.

निष्कर्ष

आसाममधील काँग्रेसचे नेते अमजात अली यांना हत्यारांसह पकडण्यात आल्याचा दावा असत्य आहे. या माहितीसोबत असलेली छायाचित्रे बांगलादेश आणि काश्मीरमधील जुन्या घटनांची आहेत.

Avatar

Title:आसाममध्ये काँग्रेस नेते अमजात अली यांना अटक झाल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False