
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी मोदींना मानसिक रुग्ण म्हटल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

तथ्य पडताळणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल उर्मिला मातोंडकर यांनी असे उद्गार काढले आहेत का? याचा शोध असताना आम्हाला news18.com या संकेतस्थळावरील एक वृत्त दिसले. उर्मिला मातोंडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर बनविण्यात आलेल्या चित्रपटावर टीका केल्याचे दिसून येते. ही टीका करताना तिने कुठेही पंतप्रधान मोदींना मानसिक रुग्ण म्हटलेले नाही.

उर्मिला मातोंडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक चांगले व्यक्ती आहेत पण त्यांच्या सरकारची धोरणे योग्य नाहीत, असे मत व्यक्त केल्याचे वृत्तही इंडिया टूडेच्या संकेतस्थळावर आम्हाला दिसून आले. उर्मिला मातोंडकर यांच्या फेसबुक पेजवर आणि ट्विटर अकाऊंटवरही त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत असे कोणतेही वक्तव्य केल्याचे दिसून येत नाही.

उर्मिला मातोंडकर यांनी असे उद्गार काढले नाहीत, तर असे उद्गार कोणी काढले असा प्रश्न आम्हाला पडला. याबाबत शोध घेतला असता छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मोदींवर टीका केली असल्याचे वृत्त लोकमतच्या संकेतस्थळावर आम्हाला दिसून आले.

उर्मिला मातोंडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल असे उद्गार काढले आहेत का, हे शोधत असतानाच संजय निरुपम यांनी त्यांना औरंगजेब याचा आधुनिक अवतार म्हटल्याचे लोकसत्ताने दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले.

निष्कर्ष
उर्मिला मातोंडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वेळोवेळी टीका केली आहे. त्यांनी मोदींना कुठेही मानसिक रुग्ण असे म्हटलेले नाही. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अशा स्वरुपाचे वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:तथ्य पडताळणी : उर्मिला मातोंडकरने मोदींना मानसिक रुग्ण म्हटले का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
